लालेलाल हिटमॅन!! रोहित शर्माने लुटला धुळवडीचा आनंद (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण देशभरात होळीचा आनंद लुटला जात आहे. एकमेकाना रंग लावून आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. यात मग क्रिकेटपटु तरी कसे मागे राहतील. भारताचा कर्णधार आणि आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मानेही होळीचा (Rohit Sharma Holi) आनंद लुटला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर अकाउंट वरून रोहितचा रंग पंचमी खेळतानाचा विडिओ शेअर केला आहे.

आपण या विडिओ यामध्ये पाहू शकता कि रोहित शर्मा अगदी लालेलाल झाला आहे. तो आपल्या सहकाऱ्यांवर पाण्याचा वर्षाव करत असल्याचे दिसून येते. रोहितच्या रंगलेल्या चेहऱ्यावरूनच हे स्पष्ट होतंय कि त्याने अतिशय उत्साहात आणि जोशात होळीचा आनंद लुटला आहे. रोहितचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. रोहितचा चाहतावर्ग मोठा असून त्यांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

दरम्यान, कालच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला जरी गुजरात विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रोहितच्या बॅट मधून चांगल्या धावा निघाल्या. सलामीला आलेल्या रोहितने चौफेर फलंदाजी करत २९ चेंडूंतच 43 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ गगनचुंबी षटकार ठोकला. मात्र रोहित बाद होताच मुंबईचा डाव गुंडाळला आणि अखेर मुंबई इंडियन्सला ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.