रोहित शर्मा जाड अन निष्प्रभावी कॅप्टन; काँग्रेस प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या कामगिरीमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. संघाने प्रत्येक स्पर्धत दमदार यश मिळवले आहे. पण असे असले तरी आता याच भारतीय संघाच्या एका खेळाडूवर टीका टिपणी होताना दिसत आहे. काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) तो जाड आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनके फॅन्स नाराज झाले आहे. या आधीही त्याच्यावर अशा टीका करण्यात आल्या होत्या, पण त्याने प्रत्येक वेळी त्याच्या दमदार कामगिरीमुळे हे सिद्ध केलं आहे कि तो स्पर्धा खेळण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे.

रोहित शर्मावर टीका –

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये शानदार कामगिरी करत आहे. अशातच सोशल मीडिया “X” वर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काँग्रेसचे प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी रोहित शर्माला टॅग करत एक पोस्ट केली आहे. यात त्या म्हणतात कि “खेळाडू म्हणून रोहित शर्मा जाड आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तो निश्चितच भारताचा सर्वात निष्प्रभावी कॅप्टनही आहे”

“त्याच्याशी तुलना केली असता, त्याचे कोणतेही विश्वस्तरीय वैशिष्ट्य नाही, जे त्याच्या आधीच्या खेळाडूंप्रमाणे, जसे की गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि इतर. तो एक सामान्य कर्णधार आणि सामान्य खेळाडू आहे, ज्याला भारताचा कर्णधार होण्याची संधी फक्त नशिबाने मिळाली.”

रोहित शर्माची जबरदस्त कामगिरी –

रोहित शर्माच्या कामगिरीची चर्चा नेहमीच होत असते. तो वेळोवेळी त्याच्या मॅच फिटनेसवर लक्ष देत असतो. पण या काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्तिथ झाले आहेत. आणि पुढे या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघाने अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तसेच T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताने सर्व सामने जिंकून विजेतेपद पटकावले आहे. याचसोबत आता सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधेही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.