हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rohit Sharma । मुंबईचा राजा रोहित शर्मा… हा गजर फक्त वानखेडे स्टेडियमवरच नव्हे तर संपूर्ण देशात ऐकायला मिळतोय. परंतु आता याच मुंबईच्या राजाला आता मुंबईच्याच संघातून वगळण्यात आलं होय. होय, तुम्ही वाचताय ते १०० टक्के खरं आहे. मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या संघात रोहित शर्माचं नाव नसल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.मुंबईच्या संघात रोहित शर्माचे नाव कुठेही दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे कारण ? Rohit Sharma
एकीकडे बीसीसीआयने सर्वच खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी मध्ये सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत, असं असतानाही रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव मुंबईच्या संघात दिसत नसल्याने त्याचे चाहते संभ्रमात पडले. परंतु खरं कारण वेगळंच आहे. सध्या रोहित शर्मा उपलब्ध नसल्यामुळे त्याचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आलेला नाही असं बोललं जातंय. याबाबत एमसीएच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष यांनी माहिती देत सांगितलं कि रोहित शर्मा आणि इतर भारतीय संघातील खेळाडू जेव्हा उपलब्ध होतील, तेव्हा त्यांचा संघात समावेश करण्यात येईल. सध्या ते खेळण्यासाठी उपलब्ध नसताना संघात नाव टाकणं योग्य ठरणार नाही. म्हणूनच मुंबईच्या संघात सध्या तरी रोहित शर्माचे नाव दिसत नाही.
फक्त रोहित शर्माचं नव्हे तर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यासारख्या प्रमुख खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी साठी मुंबईच्या संघात स्थान मिळालेलं नाही. . याचा अर्थ असा नाही की ते सर्व देशांतर्गत क्रिकेटला मुकतील. मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, “हे सर्व खेळाडू उपलब्ध झाल्यावर संघात स्थान मिळवतील. जर ते उपलब्ध नसतील तर त्यांची जागा घेणे आणि संघातून कोणत्याही तरुण खेळाडूला वगळणे योग्य ठरणार नाही.
मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे आणि तो विश्रांती घेणार आहे. काही सामन्यांनंतर तो मुंबई संघात सामील होईल. कदाचित पहिल्या एक-दोन सामन्यांनंतर तो मुंबई संघात सहभागी होईल,” अशी माहिती समोर येत आहे.




