Rohit Sharma : रोहित शर्मा निवृत्त कधी होणार?? स्वतःच सांगितली ‘ती’ वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचे वाढते वय पाहता नेहमीच त्याच्या निवृत्तीची चर्चा होत असते. सध्या रोहितचे वय ३६ वर्ष आहे त्यामुळे तो आणखी किती वर्ष क्रिकेट खेळेल हे सांगता येत नाही. मात्र आता खुद्द रोहित शर्मानेच आपल्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या भारत आणि इंग्लंड मध्ये कसोटी मालिका सुरु असून लंच ब्रेकदरम्यान रोहित शर्माने दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत रोखठोकपणे सांगितलं आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, गेल्या काही वर्षात माझा खेळ सुधारला आहे मात्र ज्या दिवशी मला सकाळी उठून वाटेल की मी आता खेळू शकणार नाही, तेव्हा मी निवृत्ती घेईन. त्यामुळे सध्या तरी रोहितच्या डोक्यात निवृत्तीबाबत कोणताही विचार नसल्याचे स्प्ष्ट होत आहे. तसेच रोहितने सतत वर्ल्डकप जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 2019 मध्ये मी 5 शतके झळकावली पण आपण वर्ल्डकप हरलो. त्यामुळे ट्रॉफीला अधिक महत्त्व आहे. कर्णधार म्हणून मला संघाला ट्रॉफी जिंकवून द्यायची आहे. महत्वाचे म्हणजे याच वर्षी t २० विश्वचषक स्पर्धा आहे अशावेळी रोहीतनेच संघाचे नेतृत्व करावे अशी इच्छा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.

कस आहे रोहितचे करिअर – Rohit Sharma

दरम्यान, रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी 54 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 3737 धावा, एकदिवसीय सामन्यात 10709 धावा आणि 3974 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. आत्तापर्यंत रोहितने 46 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. ज्यामध्ये 10 कसोटी, 31 एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी-20 शतकांचा समावेश आहे. त्याच्या कर्णधारपदाच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या नेतृत्वाखालील 12 कसोटींपैकी भारतीय संघाने 6 सामन्यात विजय मिळवला आहे तर 3 सामने गमावले आहेत. तर ४५ एकदिवसीय सामन्यांपैकी रोहितने ३४ सामन्यात भारताला विजय मिळवून दिला आहे. याशिवाय 54 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 42 सामने जिंकून रोहित भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.