Rohit Sharma Viral Video। मुंबई इंडियन्सची आण बाण आणि शान असलेला रोहित शर्मा नेहमीच चर्चेत असतो. रोहित सध्या फॉर्मात नसला तरी आजही मुंबई इंडियन्सचा आयकॉन खेळाडू म्हणून ओळखला जातो. रोहितने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. मात्र फ्रेंचायजीने त्याला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्याकडे दिल्यानंतर मुंबईची कामगिरीही ढासळली आहे. यंदाही मुंबई इंडियन्स म्हणावी तशी फॉर्मात नाही. संघाने ३ पैकी अवघ्या १ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यातच आता रोहित शर्माचा एक विडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे तो मुंबईच्या संघात नाराज तर नाही ना? या चर्चाना जोर आला आहे… रोहितचा हा विडिओ आहे तरी कोणता? तेच आपण बघुयात….
जे करायचे होते, ते मी केले, आता काहीही करण्याची गरज नाही- Rohit Sharma Viral Video
आज मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपरजाईंटशी आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर खान बरोबर चर्चा करताना दिसत आहे. यामध्ये तो म्हणतोय कि, व्हा मला जे करायचे होते, ते मी केले, आता मला काहीही करण्याची गरज नाही. रोहित पुढे अजून काहीतरी बोलणार तेवढ्यात पाठीमागून लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत येतो आणि रोहितला मिठी मारतो.. त्यानंतर रोहित आणि झहीर खान यांच्यातील चर्चा थांबते. सोशल मीडियावर हा विडिओ (Rohit Sharma Viral Video) वाऱ्यासारखा पसरला आहे. रोहित शर्मा नेमकं कोणत्या अनुषंगाने बोलला यावर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. रोहित मुंबईच्या संघात नाराज आहे का? या चर्चानाही जोर आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरून तो डिलीट करण्यात आला होता. मात्र, काही वेळातच पुन्हा एकदा अपलोड करण्यात आला.
Q: For how long are you going to watch this reel? 😍
— Mumbai Indians (@mipaltan) April 3, 2025
A: Haaanjiiii 🫂💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/e2oxVieoz2
खरं तर रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर रोहितने मुंबईला तब्बल ५ वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र तरीही २०२४ च्या हंगामापूर्वी रोहितकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे तो सध्या संघात फलंदाज म्हणून खेळत आहे. मुंबई इंडियन्सने त्याला १६ कोटी रुपयांत रिटेन केले आहे. मात्र मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माचा खराब फॉर्म हि चिंतेची बाब आहे . मुंबईचा हा माजी कर्णधार धावा काढताना चाचपडताना दिसतोय.. त्याने आत्तापर्यंत ३ सामन्यात फक्त २५ धावा काढल्या आहेत. मुंबईला विजय मिळवायचा असेल तर रोहितला आपला फॉर्म दाखवावा लागेल आणि मोठी खेळी खेळावी लागेल.