Rohit Sharma: एकही दिल है कितनी बार जितोगे; रोहितच्या त्या कृतीने जिंकली सर्वांची मने (Video)

0
2
Rohit Sharma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rohit Sharma – मुंबईतील वानखेडे स्टेडियमने काल म्हणजेच 19 जानेवारी रोजी आपली 50 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूंसह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होते . सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, रवी शास्त्री यांसारख्या खेळाडूंनी या प्रमुख कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान चॅम्पियन्स 2025 ची ट्रॉफी वानखेडे स्टेडियमवर आणण्यात आली आणि त्या ट्रॉफीसोबत सर्व दिग्गज खेळाडूंनी फोटो क्लिक केले. पण ते होत असताना एक खास घटना घडली. यावेळी रोहित शर्माच्या एका कृतीने साऱ्यांचीच मने जिंकली. नेमक घडलं काय तेच आपण सविस्तर पाहुयात.

आदरणीय वागणुकीबद्दल रोहित शर्माचे कौतुक –

ट्रॉफीसोबत फोटो क्लिक करतांना सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनी रोहितला ट्रॉफीच्या मध्यभागी उभे राहण्याचा आग्रह केला, परंतु रोहित शर्माने मोठ्या आदराने त्यांना नकार देत, स्वतः ट्रॉफीच्या एकदम डाव्या बाजूला उभा राहिला. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांचे फोटो ट्रॉफीच्या मध्यभागी घेतले गेले, तर रोहित शर्मा स्वतः ट्रॉफीच्या बाजूला उभा राहिला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) या कृतीने सर्वांची मनं जिंकली असून, त्याच्या आदरणीय वागणुकीचे कौतुक होत आहे. त्यानंतर, एक दुसरी घटना घडली जिथे रवी शास्त्री स्टेजवर कोपऱ्यात बसले होते, त्यावेळी रोहित शर्मा ने त्यांना मध्यभागी असलेल्या खुर्चीवर बसण्यासाठी विनंती केली आणि स्वतः आपल्या खुर्चीत बसला. या कृतीमुळे रोहित शर्माची विनम्रता आणि आदराची भावना सर्वांसमोर आली.

रोहित शर्मा (Rohit Sharma) ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत बोलताना सांगितले की, त्याच्या संघाने वानखेडे स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या 15 सदस्यीय संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे, तर शुबमन गिल संघाचे उपकर्णधार म्हणून निवडले गेले आहेत. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

हे पण वाचा : ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने केलं गुपचूप लग्न; पत्नी आहे टेनिस स्टार