रोहितने चहलला दिल्या ‘हटके स्टाईल’ शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने यु ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी साखरपुडा केला.आणि लवकरच ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली होती. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.यातच भारताचा आक्रमक फलंदाज आणि सलामीवीर रोहित शर्माने ट्विट करून चहलला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितचे हे ट्विट सध्या चांगलंच वायरल झालं आहे.

रोहितने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये RCB ची जर्सी घातलेला एक म्हातारा माणूस आणि एक तरूण रस्त्यावर उभे राहिलेले दिसत आहे. दोघेही फोटो ला पोझ देत आहेत , परंतु त्या तरूण माणसापेक्षाही तो म्हातारा माणूस फोटोसाठी जास्त उत्साही दिसत आहे. चहल म्हातारा झाल्यावर सेम असाच दिसेल आणि तरुणांसोबत २०५० सालीही असाच फोटो काढेल, असं रोहितने म्हटलं आहे. तसेच त्याला साखरपुड्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच चहलही IPL 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.