Rohit Sharma : रोहित मुंबईच्या जर्सीत कधीच दिसणार नाही, त्याने शेवटची मॅच खेळलीय; बड्या खेळाडूने उडवली खळबळ

rohit sharma mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आता कधीच मुंबईच्या निळ्या आणि सोनेरी जर्सीत दिसणार नाही. त्याने आपली शेवटची मॅच खेळली आहे असा मोठा दावा माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीच रोहितचे कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवल्याने आधीच मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल मध्ये चर्चेत राहिली होती.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, मला वाटते की रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सामना खेळला आहे, त्या सामन्यात त्याने अर्धशक सुद्धा मारलं होते. आता पुन्हा तो मुंबई इंडियसच्या जर्सीत दिसेल असं मला वाटत नाही. हे फक्त माझं मत आहे, कदाचित माझं चुकत सुद्धा असेल पण तरीही मला वाटत रोहित शर्मा पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही. रोहितला रिटेन व्हावं असं वाटत नसेल किंवा मुंबई इंडियन्स त्याला जाऊ देईल. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, मुंबई इंडियन्स ईशान किशनला सुद्धा कायम ठेवणार नाही. ते ‘राइट टू मॅच’ कार्ड वापरू शकतात कारण 15.5 कोटी रुपये खूप पैसे आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की इशानला कायम ठेवले जाईल.

दरम्यान, रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे आले होते. 2013 ते 2023 असं सलग १० वर्ष रोहितने मुंबईचे नेतृत्व केलं होते. त्याने आपल्या नेतृत्वाखाली तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी मुंबईला जिंकून दिली आहे. रोहित शर्मा मुंबईची आन बाण आणि शान राहिला आहे. मात्र 2020 च्या आयपीएल विजेतेपदानंतर मुंबईला पुढच्या तीन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यात अपयश आल्यानंतर मुंबईने रोहितच्या ऐवजी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिले. परंतु हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ अगदी तळाशी गेला.