हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Roof Leak Repair) गेल्या काही दिवसांत पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार बॅटिंग केली आहे. आता पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक लोकांच्या घरात छतगळती सुरु झाली असेल. अशा परिस्थितीत आता लोक घराला वॉटरप्रूफ बनवण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करताना दिसतील. तर काही लोक जिथे छतातून पाणी येत असेल तिथे जमिनीवर बादल्या ठेवताना दिसतील. बहुतेक कौलारू वा पत्र्यांच्या घरात पावसाळ्यामध्ये छतगळतीची समस्या होते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर या पावसाळ्यात बादल्या नको, आम्ही सांगतोय त्या सोप्प्या ट्रिक्स वापरून बघा. चला लगेच जाणून घेऊया.
छतगळती कुठून होतेय ते आधी समजून घ्या
पावसाळ्यात छतगळती होत असेल तर आधी छताला कुठे क्रॅक आहे ते समजून घ्या. (Roof Leak Repair) तो किती मोठा क्रॅक आहे हे जाणून घ्या. म्हणजे समस्या सोडवणे थोडे सोपे होईल. क्रॅक किती आहे? हे पाहून त्याच्या आधारे सोल्युशन निवडा आणि जर छताला मोठा क्रॅक असेल तर एक्स्पर्ट मदत घ्या.
छत दुरुस्त करण्याआधी ‘ही’ गोष्ट करून घ्या
छतगळती होत असेल तर तो भाग दुरुस्त करण्याआधी त्याला कोरडे करून घ्या. (Roof Leak Repair) कारण, ओल्या छतावर क्रॅक भरण्यासाठी लावलेली कोणतीही गोष्ट नीट सेट होत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा लीकेजची समस्या उद्भवते. अशावेळी लिकेज असलेला भाग सुकवायला फॅनचा वापर करता येईल.
क्रॅक भरण्यासाठी काय वापराल? (Roof Leak Repair)
छतगळती थांबण्यासाठी तुम्हाला क्रॅक भरावा लागेल. याकरता सिमेंटचा वापर करता येईल. पण हे काम पेट्रोलने अधिक चांगले होते. म्हणून सिमेंटमध्ये पेट्रोल तसेच थर्माकोलचे तुकडे मिसळून घ्या. काही वेळाने तयार पेस्ट क्रॅक असलेल्या ठिकाणी लावून घ्या. ही पेस्ट लावल्यानंतर सुकायला २- ३ तास लागतात. जेव्हा तुम्ही ही पेस्ट क्रॅकवर लावाल तेव्हा हातात मोजे घालायला विसरू नका.
दुरुस्तीनंतर पेंटिंग करून घ्या
छोटे छोटे क्रॅक असतील तर ते तुम्ही पेट्रोल मिश्रित सिमेंटने भरू शकता. (Roof Leak Repair) तो भाग सुकल्यानंतर गळती बंद होईल. यानंतर दुरुस्तीची चिन्हे दिसू नये म्हणून पेंटिंग करा. मात्र, पेंटिंग करण्याआधी तो भाग पूर्णपणे सुकला आहे का? याची खात्री करून घ्या.