Rose Day 2024 : ऐकलं का? ‘या’ गुलाबासाठी मोजावे लागतात 130 कोटी रुपये

Rose Day 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rose Day 2024) फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. कारण या महिन्यात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. आजपासून व्हेलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगलांमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळतोय. गुलाबाचं फुल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. म्हणूनच आज ७ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हेलेंटाईन वीकचा पहिला दिवस अर्थात ‘रोझ डे’ साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी अनेक प्रेमवीर आपल्या प्रियसीला गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करतात.

व्हेलेंटाईन वीक सुरु झाला म्हणताच गुलाबाच्या फुलाचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना जगभरात एक असे गुलाबाचे फुल आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्काचं बसेल. या गुलाबाच्या फुलाची जितकी किंमत आहे तितके पैसे तुमच्याकडे असतील तर लोक तुम्हाला कोट्यधीश म्हणून ओळखतील. पण हे गुलाब एखादा कोट्यधीश किंवा गर्भ श्रीमंत व्यक्ती सुद्धा १०० वेळा विचार करूनच विकत घेत असेल. चला तर जाणून घेऊया या महागड्या गुलाबाविषयी.

जगातील सर्वात महागडं गुलाब (Rose Day 2024)

प्रेम आणि गुलाब यांचा घनिष्ट संबंध आहे. कारण गुलाबाचं फुल अत्यंत कोमल, सुंदर आणि आकर्षक असतं. अगदी कुणीही प्रेमात पडेल असंच. गुलाबाच्या फुलात विविध जाती, प्रकार आणि रंग आढळतात. पण जगभरात एक असं गुलाब आहे जे इतर गुलाबांच्या किंमतीपेक्षा काहीच्या काही महाग आहे. या गुलाबाचं नाव आहे ‘ज्युलिएट रोझ’. हे गुलाब त्याचे सौंदर्य, सुगंध आणि किंमतीसाठी प्रसिद्ध आहे. महाग महाग म्हणून किती महाग? १०० रुपये, ५०० रुपये जास्तीत जास्त १००० रुपये असा अंदाज कुणीही लावेल. पण या गुलाबाची किंमत अंदाजापेक्षाही जास्त आहे.

(Rose Day 2024) ज्युलिएट रोझ हे जगभरातील सर्वात महागड्या फुलांपैकी एक असून एका ज्युलिएट रोझची किंमत हि १३० कोटी रुपये इतकी आहे. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य सोडाच श्रीमंतीत न्हाहणारा माणूस देखील हे गुलाब विकत घेताना विचार करेल. या गुलाबाची जितकी किंमत आहे तितक्या किंमतीत लाखोंच्या प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि महागडी लाइफस्टाइल परवडेल.

ज्युलिएट रोज इतकं महाग असण्याचं कारण काय?

जगभरातील सर्वात महागड्या फुलांपैकी एक म्हणजे ज्युलिएट रोज. ज्याची किंमत १३० कोटी रुपये आहे. हि किंमत ऐकली असता एव्हढं महाग का? या गुलाबात काय वेगळं आहे? असे प्रश्न पडणे साहजिक आहे. तर या ज्युलिएट रोझची खासियत अशी आहे कि, हे गुलाब उगवण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागतो. (Rose Day 2024) या दरम्यान हे गुलाब व्यवस्थित उगवण्यासाठी त्यावर ५ मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ३४ कोटी रुपये इतका खर्च होतो. इतकेच नव्हे तर या गुलाबाच्या फुलाचा सुवास इतर गुलाबांपेक्षा फारच वेगळा आणि ताजतवाना करणारा आहे.

या गुलाबाची निर्मिती कशी झाली?

एका वृत्तानुसार, प्रसिद्ध रोझ ब्रीडर डेविड ऑस्टिन यांनी ‘ज्युलिएट रोझ’ची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. त्यानुसार २००६ साली पहिल्यांदाच ‘ज्युलिएट रोझ’ जगासमोर आले. हे गुलाब ब्रीडर डेव्हिड यांचा एक प्रयोग होता. या रोझ ब्रीडरने अनेक प्रकारच्या विविध गुलाबांच्या प्रजाती संकरित करुन ‘ज्युलिएट रोझ’ची निर्मिती केली होती. त्यामुळे ‘ज्युलीएट रोझ’ त्याच्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि एक प्रकारचा चमत्कार होता. (Rose Day 2024)

त्यावेळी पहिल्यांदाच हे गुलाब विकलं गेलं आणि तेव्हा तब्बल ९० कोटींना याची विक्री झाली होती. डेविड ऑस्टिनच्या वेबसाईटनुसार, ज्युलिएट रोझचा सुगंध चहाच्या गंधाप्रमाणे असतो. त्यामुळे हे गुलाब स्वतःतच एक वेगळेपण राखून आहे, हे सिद्ध होतं.