RRB Recruitment 2024 : 10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; 4660 पदांसाठी भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : 10 वी पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. RRB ने 4660 पदांसाठी बम्पर भरती (RRB Recruitment 2024) जाहीर केली आहे. या भरतीच्या अंतर्गत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समधील सब-इन्स्पेक्टर पदांसाठी एकूण ४५२ जागा आणि कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल ४,२०८ जाग भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच १५ एप्रिल पासून अधिकृत वेबसाईट वर सुरु झाली आहे.

काय आहे शैक्षणिक पात्रता – RRB Recruitment 2024

या मेगा भरती अंतर्गत कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर SI रिक्त पदांसाठी, सदर उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. जे उमेदवार पात्रता परीक्षेत बसले आहेत परंतु त्यांचा निकाल जाहीर झाले नाहीत ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.

वयोमर्यादा किती?

कॉन्स्टेबल रिक्त पदांसाठी, अर्जदारांचे वय १ जुलै २०२४ रोजी १८-२८ वर्षांच्या दरम्यान असावे. तर SI रिक्त पदांसाठी, सदर उमेदवारांचे वय २०-२८ वर्षांच्या दरम्यान असावे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये COVID-19 साथीच्या आजारामुळे विहित मर्यादेपेक्षा वयोमर्यादेत 3 वर्षांची एकवेळ सूट समाविष्ट आहे.

अर्ज फी किती?

SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) उमेदवार वगळता बाकी सर्व उमेदवारांसाठी दोन्ही पदांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे.

अर्ज कुठे कराल ?

अर्जदारांना त्यांचे फॉर्म RRB च्या संबंधित वेबसाइटवर सबमिट (RRB Recruitment 2024) करावे लागतील. वेगवेगळ्या राज्यावर वेगवेगळ्या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल. मुंबई विभागासाठी तुम्ही w.w.w.rrbmumbai.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.