RRB Recruitment 2024 | रेल्वेमध्ये 8000 पदांसाठी बंपर भरती;पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RRB Recruitment 2024 अनेक विद्यार्थ्यांची रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्याच विद्यार्थ्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती बोर्ड (RRB Recruitment 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. रेल्वे भरती बोर्डाने 8000 प्रवासी तिकीट परीक्षक या पदांसाठी रिक्त जागा काढलेल्या आहेत. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची सविस्तर माहिती आहे. मे 2024 मध्ये या भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. अशी अपेक्षा आहे . परीक्षेची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही. आता या भरतीबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत

महत्वाची माहिती | RRB Recruitment 2024

  • पदाचे नाव – प्रवासी तिकीट परीक्षक
  • वयोमर्यादा – किमान 18 चर्ष, कमाल 28 वर्ष
  • पगार – 27, 400 ते 45 हजार 600 रुपये
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे असते. किंवा बोर्डातून डिप्लोमा पूर्ण असावा.

निवड प्रक्रिया

सगळ्यात आधी तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होईल. तसेच तुमची वैद्यकीय चाचणी होईल.

अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी – 500 रुपये
अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासाठी – 300 रुपये

अर्ज कसा करावा ?

  • सगळ्यात आधी तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर लेटेस्ट या ऑप्शनवर गेल्यावर तुम्हाला रेल्वे टीईटी रिक्रुटमेंट हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तिथे आलेली सगळी माहिती आणि पुढील बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा फोटो आणि अंगठ्याची ठसे अपलोड करा.
  • पुढील पेजवर तुमची फी जमा करा आणि सगळी माहिती भरलीये का याची तपासणी करून तुमचा अर्ज सबमिट करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा