RPF Constable & SI Recruitment 2024 | रेल्वेत RPF कॉन्स्टेबलची बंपर भरती, तब्बल 4600 रिक्त पदांची होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RPF Constable & SI Recruitment 2024| जे उमेदवार रेल्वेच्या नोकरीसाठी तयारी करत आहेत. किंवा ज्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्या सगळ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता रेल्वे भरती बोर्डाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आरपीएफ कॉन्स्टेबल आणि एसआय पदांसाठी ( RPF Constable & SI Recruitment 2024)भरती प्रक्रिया जाहीर केली आहे यामध्ये तब्बल 4600 रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये रेल्वेच्या भरती बोर्डाने कॉन्स्टेबल पदासाठी 4206 रिक्त जागांची भरती काढलेली आहे तर एसआय पदांसाठी 452 रिक्त पदांची भरती केलेली आहे यासाठी बोर्डाकडून नुकतीच देखील जाहीर करण्यात आलेली आहे.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार

आरपीएफ कॉन्स्टेबलचे भरतीचे अर्ज प्रक्रिया ही 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 14 मे पर्यंत यासाठी अर्ज करू शकता. म्हणजे जवळपास 1 महिना तुम्हाला अर्ज करण्यासाठी कालावधी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता.

वयोमर्यादा | ( RPF Constable & SI Recruitment 2024

RPF मध्ये उपनिरीक्षक पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असणे गरजेचे आहे. म्हणजेच 1 जुलै 2024 पासून वयाची केली जाईल. तर आरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी तुमचे वय 18 वर्षे ते 25 वर्षे या दरम्यान असणे गरजेचे असते.

शैक्षणिक पात्रता

आरपीएफ कॉन्स्टेबलच्या ( RPF Constable & SI Recruitment 2024) पदासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उपनिरीक्षक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही विषयाची पदवी असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये एवढे शुल्क आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएससाठी 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.