भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडीत आढळले चक्क 2,60,000 रुपये

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कधी कधी आपल्या आसपास खूप अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक घटना जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नौशेरा भागात घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या भिख मागून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडी मध्ये चक्क जवळपास 2,60,000 रुपयांची रक्कम मिळाली आहे. याबाबतचे वृत्त ए एन आय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , जम्मू काश्मीर मधल्या राजौरी येथील नौशेरा भागात एक वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. तिच्या भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ही वृद्ध महिला मागील ३० वर्षणापासून इथे राहत होती. तिची परिस्थिती बिकट झाल्याने काल २ जुलै ला राजौरी येथील एका टीम ने तिला वृध्दआश्रमात दाखल केले. यावेळी नगर पालिकेच्या टीम कडून घरातील कचऱ्यात एक लिफाफ्यामध्ये नोटा सापडल्या. तिच्या झोपडीत जवळपास 2,60,000 रुपये मिळाले आहेत.