Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day | पृथ्वीवरील या ज्वालामुखीतून बाहेर येतंय चक्क सोनं; दृश्य पाहून NASA ही झालं थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करण्याची सोय राहिलेली नाहीये. लवकरच एक तोळा सोन्याचा दर 75000 च्या पुढे जाणार आहे. अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. भारतामध्ये अनेक लोकांना सोन्याबद्दल खूप आकर्षक आहे. भारतामध्ये स्त्रिया खास करून सोन्याचे दागिने परिधान करतात. परंतु आता सोन्याच्या किमती जास्त वाढल्याने अनेक लोक सोने खरेदी करत नाही. अशातच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीसमोर एका विशेष जागेसंदर्भात माहिती दिलेली आहे. (Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day)

हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर एक अशी ज्वालामुखी आहे. ज्यामधून खऱ्याखुरा सोन्याचा पाऊस पडतो. (Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day) इरेबस डोंगरातील एकाच ज्वालामुखीतून रोज लाखो रुपयांचे सोनं बाहेर फेकले जाते. हा ज्वालामुखी अंटार्टिका खंडामध्ये सक्रिय आहे. या ज्वालामुखीतून सोन्यासोबत इतर काही पदार्थ देखील बाहेर फेकले जातात. अमेरिकन अंतराळ संस्थेत असलेल्या नासाने याचा खुलासा केला आहे.

दररोज पाच लाखांच सोनं बाहेर | Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day

डोंगरामध्ये असलेल्या या ज्वालामुखीमधून रोज जवळपास 6000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 5 लाख 1 हजार रुपयांपेक्षाही अधिक किमतीचा सोनं बाहेर येत असतं बाहेर फेकले जातात.

एक हजार किलोमीटरपर्यंत सोने पसरते

या ज्वालामुखीमधून ठराविक वेळाने गॅसचा फवारा येतो. आणि त्या फवाऱ्याबरोबर सोन्याचे काही कण हे बाहेर फेकले जातात. हे सोने क्रिस्टल म्हणजे स्फटिक रूपात असते. हे सोनं स्पटिक रूपात असल्याने ते ज्वालामुखी असलेल्या डोंगरापासून फार दूर अंतरापर्यंत पसरले जाते. हे सोने ज्वालामुखीपासून 621 मैल म्हणजेच एक किलोमीटरच्या परिघामीध्ये फेकले जाते.

या खंडावरील सर्वात उंच डोंगर

अंटार्टिका खंडामधील इरेबस डोंगर हा सर्वात उंचीवर असणारा सक्रिय ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीची उंची तब्बल 12,448 फूट एवढी आहे. हा या खंडातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी पहिल्यांदा 1881 साली कॅप्टन सर सेम क्लार्क यांनी पाहिला होता. तेव्हा त्यामधून लाव्हारस आणि धूर बाहेर पडत होता.

या ज्वालामुखीमध्ये एका इयर न्यूझीलंडचा विमान देखील पडले होते. या अपघातामध्ये तब्बल 257 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बर्फामुळे निर्माण होणाऱ्या व्हाईटआऊटमुळे हा अपघात झाल्याचा दावा करण्यात आलेला होता. हा ज्वालामुखी बर्फाच्छादित असल्याने वैमानिकांना तो दिसला नाही. या दुर्घटनेला माउंट एलेबस डिझास्टर म्हणून ओळखले जाते.