Tuesday, February 7, 2023

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन आणि अन्य देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. तसेच थर्मल स्कॅनिंगही केले जाईल.

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येथून प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. आगमन झाल्यावर, या देशांतील कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास किंवा कोविड 19 साठी चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल अशी माहिती देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात 201 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन संदर्भात राज्यांना काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार आगामी सण आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन लक्षात घेऊन ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण’ वर लक्ष केंद्रित करणे, मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे, कोरोनाच्या चाचण्या वाढवणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने देशातील सर्व राज्यांना दिल्या आहेत.