RTE Addmission | RTE मार्फत दरवर्षी मुलांचे प्रवेश होत असतात. यावेळी मुलांचा पहिली ते आठवी पर्यंतचा खर्च शासनाकडून केला जातो. वर्षी शासनाने यावर्षी RTE च्या नियमात काही बदल केले. आणि त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर राज्यातील जवळपास 2 लाख 11 हजार पालकांनी त्यांच्या मुलांसाठी अर्ज देखील केलेले आहे. खाजगी अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना त्यांच्या एकूण प्रवेश क्षमतेतील 25% जागा रिक्त ठेवून RTE अंतर्गत (RTE Addmission) प्रवेश देण्याचे आदेश आले होते. परंतु आता शासनाने पुन्हा एकदा या नियमात बदल करून पूर्वीसारखा प्रवेश देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता पालकांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
हा झाला नवीन बदल | RTE Addmission
RTE ने प्रवेशामध्ये त्यांच्या नियमात दुरुस्ती रद्द करून आता इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश मिळणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेले आहे. त्यामुळे आता नव्या आदेशानुसार पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहे.
त्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. दिलेल्या आदेशानुसार या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. नवीन बदलानुसार पालकांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळा निवडावी लागणार आहे. इयत्ता पहिली प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आठवीपर्यंतचा खर्च शासनाकडून शाळांना दिला जातो.