RTE मार्फत अर्ज करणे सोप्पे; ‘या’ दिवसापासून होणार प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

RTE
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील अनेक लोक हे आरटीईमार्फत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश घेत असतात. आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत राज्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी 25% राखीव जागा असतात. आणि या राखीव जागा भरण्यासाठी 2025- 26 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रवेश प्रक्रिया 18 डिसेंबर पासून चालू होणार आहे. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यापासून विद्यार्थी नोंदणीला देखील सुरुवात होणार आहे.

प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर मार्च महिन्यामध्ये लॉटरी देखील जाहीर केली जाणार आहे. तसेच जून आणि जुलै या महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे. या आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25% आरक्षित जागांसाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील उशिरा होतात. परंतु यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया लवकरच राबवण्यात आलेली आहे.

डिसेंबर महिन्यात CBSE शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. परंतु आयटीई अंतर्गत प्रवेश मात्र होत नाही. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षी जून आणि जुलै महिन्यात आरटीई मार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कोणतेही अडथळे येणार नाही.

RTE मार्फत प्रवेश घेणारे बऱ्याचशा इंग्रजी माध्यमांच्या शाळा या सीबीएससी बोर्डाच्या असतात. तसेच महाराष्ट्रात आरटीई प्रवेश सुरू होण्याआधीच इतर मुलांचे शिक्षण देखील सुरू झालेले असते. त्यानंतर आरटीई अंतर्गत विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे त्यांना बराचसा अभ्यास करून समजत नाही. तसेच ते वेगळे असल्याची त्यांना जाणीव होते. या सगळ्याचा विचार करून शिक्षण विभागाने यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे.