हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RTE Admission दरवर्षी शिक्षण हक्क अधिनियमानुसार समाजातील जे दुर्लभ आणि वंचित घटकातील विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांना 25% मोफत आरटीईमार्फत ( RTE Admission) प्रवेश दिला जातो. यामध्ये अगदी कमी पैशात या मुलांना शिक्षण दिले जाते. अशातच आता 2024- 25 च्या या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्कनुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला देखील आरटीईमार्फत तुमच्या मुलाचे शिक्षण घ्यायचे असेल, तर 16 ते 30 एप्रिलपर्यंत तुम्ही आरटीईच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
राज्य सरकारने या वर्षी शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश ( RTE Admission) घेण्याबाबतच्या पूर्वीच्या काही गोष्टींमध्ये बदल केलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळ एक किलोमीटर अंतरावर खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद महानगरपालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलो मीटर अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल, अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची शासकीय शाळा आहे. त्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश घेता येणार आहे. परंतु यासाठी तुमच्या शालेय विभागाकडून घरापासून शाळेपर्यंतचे अंतर तेवढेच आहे ना याची खात्री देखील गुगल मॅपच्या आधारे केली जाणार आहे.
राज्यातील जवळपास 75 हजार 264 शाळांनी आरटीई अंतर्गत नोंदणी केली आहे. त्या जिल्ह्यातील 3378 शाळा आहेत. आता राज्य सरकारने केलेल्या नवीन बदलांतर्गत आरटीई मार्फत राज्यातील 9 लाख 64 हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या खाजगी आणि शासकीय शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.
काही शाळांमध्ये लॉटरी काढावीच लागेल | RTE Admission
राज्यात अशा काही जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या आणि अनुदानित खाजगी शाळा आहेत. ज्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी खूप गर्दी जमते. परंतु अशा शाळांमध्ये गरजेपेक्षा जास्त अर्ज आल्यामुळे त्यांना एनआयसीच्या माध्यमातून लॉटरी काढावी लागते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घरापासून एक किलोमीटर अंतरावर केवळ इंग्रजी माध्यमाची खाजगी विनाअनुदानित शाळा आहे. अशा ठिकाणी लॉटरी काढावी लागणार आहे. यामुळेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज
https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज भरून झाल्यानंतर त्यानंतर छाननी होऊन लॉटरी निघेल. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहे. शाळांमध्ये आरटीईची गरज भासणार आहे. त्या ठिकाणी आरटीईतून प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळणार आहे.