Ruber Farming | रबर हे आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूमध्ये वापरले जाणारे एक पीक आहे. या रबरापासून टायर, चप्पल नळ्या, वायुरक्षक यांसारख्या गोष्टी बनवल्या जातात. या रबराची शेती भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रबराची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
महाराष्ट्रात देखील ही शेती केली जाते. रबराची शेती हा एक दीर्घकालीन व्यवसाय देखील आहे. आता या रबराचे पीक घेण्यासाठी त्या झाडांची काय काळजी घ्यावी लागते? त्याचप्रमाणे हवामान कसे लागते याची सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया.
हवामान आणि जमीन | Ruber Farming
रबराच्या झाडांना उष्ण आणि आद्र हवामान आणि चांगली जमीन आवश्यक असते. या सगळ्या गोष्टी असेल तरच रबराची झाडे चांगले येतात.
रोपांची निवड
रबराच्या रोपांची निवड करताना चांगली उत्पादन क्षमता असलेल्या रबराच्या रोपांची निवड करणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.
देखभाल
या रबराच्या झाड आणि उत्पादनासाठी आवश्यक असणारी निंदान आणि खते यांची माहिती असणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला फायदा मिळू शकतो.
रबर रोपाच्या (Ruber Farming) वाढीसाठी योग्य किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल 34 अंश सेल्सिअस आहे. त्याच वेळी, तज्ञांच्या मते 4 ते 6 पीएच पातळी असलेली चिकणमाती माती रबर लागवडीसाठी आदर्श आहे.
विशेष म्हणजे रबरची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि जागतिक बँकेकडून आर्थिक मदतही मिळते. जंगलात वाढणारी रबराची झाडे साधारणत: ४३ मीटर उंच असतात, तर व्यावसायिक कारणांसाठी वाढलेली रबराची झाडे काहीशी लहान असतात. यात 8000 प्रजाती आणि 280 जाती आहेत.मात्र, आत्तापर्यंत त्याच्या केवळ 9 जाती लागवडीसाठी वापरल्या जातात. रबराच्या झाडांपासून मिळणाऱ्या लेटेक्समध्ये 25 ते 40 टक्के रबर हायड्रोकार्बन्स असतात. उत्पादित रबराची गुणवत्ता लेटेक्सच्या सुसंगतता आणि प्रवाहाद्वारे मोजली जाते.
2.75 किलो पर्यंत रबर लेटेक्स मिळू शकते | Ruber Farming
त्याचबरोबर स्टार्ट-अप अंतर्गत आता तरुणाईही रबरकडे आकर्षित होत आहे. विशेष बाब म्हणजे रबर लागवडीशी संबंधित शेतकऱ्यांना भारत सरकारकडून देण्यात येणारे पीक कर्ज, अनुदान, एमएसपी आणि इतर सवलतींचीही विभागाकडून काळजी घेतली जाते. एका एकरात रबराची लागवड केल्यास ७५ ते ३०० किलो रबर तयार होते. अशा प्रकारे तुम्ही एका झाडापासून वर्षभरात 2.75 किलो रबर लेटेक्स मिळवू शकता. अशा परिस्थितीत रबर विकून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.