हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rules Changed From 1 July । आज २७ जून हि तारीख असून लवकरच जुलै महिना सुरु होईल. नवीन महिन्यात सरकारने काही नियमात असे काही बदल केले आहेत ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो, तुमचा आर्थिक ताण वाढू शकतो. बँकिंग पासून ते थेट ट्रेनच्या तिकिटापर्यंत या नियमात बदल करण्यात आलेत. हे नियम नेमके कोणकोणते आहेत आणि तुमच्या खिशावर कसा परिणाम होऊ शकते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) ट्रेन तिकीट महागणार –
१ जुलैपासून रेल्वेचे तिकिटं महागणार आहे. नव्या नियमानुसार, १ जुलैपासून (Rules Changed From 1 July) नॉन-एसी कोचचं भाडे प्रति किलोमीटर १ पैशाने आणि एसी कोचचे भाडे प्रति किलोमीटर २ पैशानं वाढणार आहे. जास्त मोठ्या प्रमाणावर हि दरवाढ नसल्याने प्रवाशांना मोठा असा आर्थिक फटका बसणार नाही हे खरं आहे. परंतु जास्तीचे पैसे खर्च होतील हे मात्र नक्की.
२) गॅसच्या किंमती बदलणार – Rules Changed From 1 July
जुलै महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. देशातील तेल कंपन्याव्यावसायिक गॅस सिलिंडरचे अपडेटेड दर १ जुलैला आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ७ जुलैला जाहीर होऊ शकतात. या किमतीत किती बदल होतोय यावरून तुमचा आर्थिक ताण कमी जास्त होणार आहे.
३) ATM मधून पैसे काढणे महागणार –
1 जुलैपासून बँकेच्या एटीएमशी संबंधित नियमही बदलणार आहेत. त्यानुसार, ग्राहकांना बँकेच्या एटीएमचा वापर महाग होऊ शकतो. नवीन नियमांनुसार, ग्राहकांना ATM मधून फक्त ३ वेळा मोफत पैसे काढता येतील. परंतु मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारले जाईल तर प्रत्येक नॉन फायनान्शिअल व्यवहारासाठी 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल. Rules Changed From 1 July
४) क्रेडिट कार्डच्या नियमात बदल –
1 जुलैपासून HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्येही बदल केले जातील. थर्ड पार्टी अॅपद्वारे HDFC क्रेडिट कार्ड पेमेंट करण्यासाठी लोकांना 1% शुल्क द्यावे लागेल. युटिलिटी बिल पेमेंटवरही शुल्क आकारले जाईल.
५) पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल –
१ जुलैपासून पॅन कार्डच्या (Rules Changed From 1 July) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे . तर ज्यांच्याकडे आधीच ही दोन्ही कागदपत्रं आहेत त्यांना ती लिंक करावी लागतील. ३१ डिसेंबर २०२५ ही यासाठी शेवटची तारीख आहे.