Rules Changed From 1 May : मे महिन्यात बदलणार ‘हे’ महत्वाचे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rules Changed From 1 May) सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एप्रिल महिना संपताच मे महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील काही बँकांचे महत्वाचे नियम बदलणार असल्याचे समजत आहे. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. देशात गॅस सिलेंडरच्या किंमती देखील वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात मे महिन्याची सुरुवात मोठमोठ्या धक्क्यांनी होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत? आणि बदलेल्या नियमांचा काय परिणाम होणार? याबाबतही माहिती घेऊया.

LPG गॅस सिलेंडरच्या दरात बदल होणार

एकतर महागाईने सर्वसामान्यांचा कणा मोडायची शपथ घेतली आहे. अशातच घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या मे महिन्याच्या १ तारखेपासून नवे सुधारित दर लागू केले जाणार आहेत. (Rules Changed From 1 May) काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुश करायचं म्हणून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या. पण आता व्यावसायिक आणि घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीचा दर सुधारित केला जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचे म्हणजे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरचे सुधारित दर सांगितले जातात. यात एकतर किंमती वाढतात, कमी होतात किंवा स्थिर राहतात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने सुधारित दर (Rules Changed From 1 May) घोषित केलेले नाही, असे म्हटले जात आहे. कारण, जर गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करायचा असेल तर यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.

HDFC बँकेकडून विशेष एफडी योजनेच्या मुदतीत वाढ

भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून HDFC बँक ओळखली जाते. दरम्यान, या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी काही विशेष योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये ज्येष्ठांसाठी या बँकेने विशेष सीनियर सिटीझन केअर FD सुरू केली आहे. (Rules Changed From 1 May) या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठांना बँकेकडून ७.७५% व्याज दिले जात आहे. या योजनेत ५ ते १० वर्षांसाठी कमाल ५ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. दरम्यान, या विशेष FD योजनेला बँकेकडून १० मे २०२४ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ ग्राहकांना या FD मध्ये १० मे पर्यंत गुंतवणूक करता येईल.

ICICI बँकेच्या सेवा महागणार (Rules Changed From 1 May)

ICICI ही देशातील एक मोठी प्रायव्हेट बँक आहे. या बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, अलीकडेच या बँकेने बचत खात्याशी संबंधित सेवा शुल्काचे नियम बदलले आहेत. हे नियम येत्या १ मे २०२४ पासून लागू होणार आहेत. बदललेल्या नियमानुसार, ICICI बँकेच्या डेबिट कार्डसाठी ग्राहकांना ग्रामीण भागात ९९ रुपये तर शहरी भागात २०० रुपये वार्षिक शुल्क दुरावे लागणार आहे.

(Rules Changed From 1 May) तसेच, बँकेच्या २५ पानांच्या चेकबुकसाठी शुल्क आकारले जाणार नाही. मात्र यापेक्षा अधिक पानांसाठी प्रति चेक ४ रुपये शुल्क भरावे लागेल. इतकेच नव्हे तर, IMPS व्यवहाराची रक्कम प्रति व्यवहार २.५० रुपये ते १५ रुपयांपर्यंत ठरवण्यात आली आहे.

Yes बँकेने घेतला मोठा निर्णय

देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील येस बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यानुसार बँकेच्या बचत खात्याच्या विविध प्रकारांची किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आल्याचे समजत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून करण्यात येणार आहे. माहितीनुसार, पुढील महिन्यापासून बँकेच्या प्रो मॅक्समध्ये किमान सरासरी शिल्लक ५० हजार रुपये करण्यात आली आहे. तर कमाल शुल्क १ हजार रुपये निश्चित केले गेले आहे.

तसेच बचत खाते प्रो प्लस, येस रिस्पेक्ट एसए सेविंग अकाउंट आणि येस एसेन्स सेविंग अकाउंटमधील किमान सरासरी शिल्लक २५ हजार रुपये आणि कमाल शुल्क ७५० रुपये करण्यात आले आहे. (Rules Changed From 1 May) तर येस बँकेच्या प्रो खात्यासाठी किमान शिल्लक १० हजार रुपये आणि कमाल शुल्क ७५० रुपये असे करण्यात आले आहे.