नवरा बायको प्रवास करत असताना अचानक दुचाकीने घेतला पेट, गोंदियातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पती – पत्नींचा थोडक्यात जीव वाचला आहे. हे दोघे पती- पत्नी दुचाकीवरून जात असताना अचानक गाडीला आग (Fire) लागली. आग इतकी तीव्र होती की थोड्यावेळातच आगीने (Fire) रौद्र रूप धारण केले. गाडीला आग (Fire) लागल्याचे समजताच पतीने पत्नीला गाडीवरुन खाली उतरवून गाडी बाजूला फेकली. दुचाकीस्वाराच्या सतर्कतेमुळे या घटनेत पती पत्नी थोडक्यात जीव वाचला आहे.

काय घडले नेमके?
गोंदिया येथे खापरडे कॉलोनी इथे राहणार दीपक साखरे हे आपल्या पत्नीबरोबर रामनगर येथे दुचाकीने जात होते. यावेळी परमात्मा नगर इथे चालत्या गाडीला अचानक आग (Fire) लागल्याचं दिसताच त्याने पत्नीला गाडीवरून उतरवत गाडी रस्त्याच्या कडेला फेकली. यानंतर ते आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र काही वेळातच आगीने आपले रौद्र रूप धारण केले. विशेष बाब म्हणजे 10 दिवसाआधीच शोरूममधून ही गाडी घेतली होती.

हि आग (Fire) एवढी भीषण होती कि, परिसरातील लोकांनी आणि दीपकने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरी काहीच उपयोग झाला नाही. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने या घटनेत पती-पत्नी दोघेही सुखरूप आहेत. या गाडीला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!