पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया; रुपाली ठोंबरे यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात मंगळवारी रात्री शिवसैनिकांनी बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला तर यामध्ये त्यांची गाडीही फोडण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केल्यापासून शिवसैनिकांच्या मनात राग हा कायम आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता संयमाचा बांध सुटला आहे. पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया आहे, अशी टीका ठोंबरे यांनी केली.

रुपाली ठोंबरे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, खाद्या बायकोसोबत अडीच वर्ष संसार करायचा आणि मग कुरघोड्या काढायच्या ही जुनी सवय आहे, अडीच वर्ष हेच उदय सामंत मंत्री राहिले आणि आता ईडी सीबीआय मागे लागली म्हणून बंडखोरी केली. त्यामुळे सामंत यांना आता नेमकं काय बोलावे ते सुचत नाही.

यावेलो ठोंबरे यांनी शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. शिंदे गटाच्या स्थापनेमध्ये आ.सावंत यांचाही मोठा रोल असल्याचे बोलले जात आहे. शिवाय कोण आदित्य ठाकरे म्हणणारे तानाजी सावंत हे आता चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र, सावंत हे एक खेकडेवाले आहेत, असे ठोंबरे यांनी म्हंटले.