कोरोनावर करुया मात, कोणी पाहुणे येऊ नका गावात! ग्रामिण भागातील महिलांचे भन्नाट गाणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जेव्हा कोरोनां चीनमध्ये थैमान घातलेला तेव्हा चीन मधलं हे संकट आपल्या घराच्या हुंबर्यालापण येऊन धडकेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. नंतर कोरोना जगभर पसरला. त्यांनतर आपल्या देशात कोरोनाचे काही रुग्ण सापडले. मात्र तेव्हाही कोरोना घराच्या हुंबर्याला येऊन धडकेल असं वाटलंच नव्हतं. आता मात्र कोरोनानं देशासहीत महाराष्ट्रात चांगलेच पाय पसरलेत. ग्रामिण भागातही झपाट्यानं रुग्ण सापडत असल्याने लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय. मात्र गावाकडच्या लोकांनी कोरोनाबाबत जागृती करायला भन्नाट कल्पना शोधून काढलेत. मागे दवंडी पिटवून कोरोनाची जनजागृतिु केली जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झालेला. आता काही महिला गाणं रचून कोरोनाबाबत जनजागृती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर गाजतोय. पाहुण्याना गावात न येण्याचं आवाहन गावकरी यातून करताना दिसतायत.

पाहुयात हा खास व्हिडिओ –

 

[youtube https://www.youtube.com/watch?v=vpYhiA95IEI&w=560&h=315]

Leave a Comment