व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

देशातील बड्या नेत्याच्या हत्येचा कट; ISIS च्या अतिरेक्याला अटक

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । देशातील बड्या नेत्याची हत्या करण्याचा कट उधळला गेला असून रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. त्याने ही कबुली दिली आहे. सदर अतिरेकही इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS ) या संघटनेशी संबंधित आहे. हा दहशतवादी 30 वर्षीय आशियाई युवक असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली.

भारतातील सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच भाजपच्या कोणत्या तरी महत्त्वाच्या नेत्यावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. एजन्सीच्या माहितीनुसार, आरोपीने एप्रिल ते जून या कालावधीत तुर्कीमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. त्याला IS नेत्याने आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केले होते. तेथे त्याला आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेलिग्रामद्वारे तो आयएसशी जोडला गेला होता. यानंतर दहशतवाद्याने इसिसशी निष्ठेची शपथ घेतली.

रशियन सरकारी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी संघटनेने त्याला आवश्यक कागदपत्रांसह रशियाला पाठवले आणि नंतर येथून त्याला भारतात पाठवण्याची व्यवस्था केली, भारतात त्याला सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर हल्ला करण्याचे काम देण्यात आले. मात्र, दहशतवाद्याने कोणत्या भारतीय नेत्याला उडवण्याचा कट रचला होता, याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.