अफगाणिस्तानमधील शांततेसाठी तालिबान रशियाला भेटणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मॉस्को, रशिया | तालिबान या दहशतवादी संघटनेचे काही सदस्य पुढील महिन्यात अफगाणिस्तान मधील शांतता धोरणावर चर्चा करण्यासाठी रशियाला भेट देणार असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लवरोव यांनी जाहीर केलं. दोन्ही देशांसाठी ही चर्चा फलदायी ठरेल असं सीएनएन ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले.

रशिया सध्या अफगाणिस्तानच्या कोणत्याच सीमेमध्ये हस्तक्षेप करत नाही. तरीही दरम्यानच्या काळात अमेरिकाप्रणित अफगाण सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी रशियाने पुढाकार घेत आहे. अफगाणमधील रशियन नागरिकांचं व संस्थांच संरक्षण, आम्हाला महत्वाचं आहे. त्यामुळेच लष्कर व तालिबानमध्ये दुवा साधण्याच काम आम्ही करणार आहोत असंही सर्जेई म्हणाले.

अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी तात्काळ युद्धविराम घोषित केल्यानंतर ३ दिवसांनी रशियाने ही भूमिका घेतली आहे. रशियाच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पमपीओ यांनीसुद्धा काबुल आणि तालिबान यांच्यातील चर्चेला हिरवा कंदील दाखविला आहे.

Leave a Comment