Russia Supports India । पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची चिन्हे आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध उघड झाल्यानंतर भारताने पक्षविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तान मधील नेतेही भारताला युद्धाची आणि अणुबॉम्बची भीती दाखवत आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानात कधीही युद्ध होऊ शकत अशी परिस्थिती निर्माण झालीय. युद्ध झाल्यास पाकिस्तानच्या मदतीला चीन आणि तुर्की सारखे देश आहेत. दुसरीकडे आता भारताने सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात पाठिंबा मिळवायला सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे भारताचा खास मित्र असलेल्या रशियाने दहशदवादाविरोधात भारताला पाठिंबा दिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात यासंदर्भात फोनवरून चर्चाही झाली आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी आज पंप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन चर्चा केली. त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसेच निरपराध व्यक्तींच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं.भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी असं मत यावेळी पुतीन यांनी व्यक्त केलं. दहशतवाद तसेच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही व्लादिमीर पुतीन यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे. पुतीन यांच्या पाठिंब्यामुळे (Russia Supports India) भारताला १० हत्तीचे बळ मिळालं आहे.
रशिया हा भारताचा खास मित्र- Russia Supports India
रशिया हा कायमच भारताचा खास मित्र राहिला आहे. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये उत्तम संरक्षण संबंध आहेत. दोन्ही देशांनी बदलत्या जागतिक परिस्थितीत एकमेकांना सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारताला रशियाकडून अत्याधुनिक इग्ला-एस क्षेपणास्त्रे मिळाली आहेत. त्यामुळे शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडणं शक्य होणार आहे. भारतीय सैन्याने ही इग्ला-एस क्षेपणास्त्र पश्चिम सीमेवर तैनात केले आहेत. भारताने रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्रे पुरवण्यात आली आहेत
दरम्यान, या वर्षाच्या शेवटी भारतात शिखर संम्मेलन होणार असून त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या पुतीन यांना आमंत्रण दिलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशिया -युक्रेन युद्ध्याच्या पार्श्वभूमीवर वॉरंट जारी केल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारतात येणार आहेत. या आधी भारतात झालेल्या G 20 परिषदेला पुतिन अनुपस्थित राहिले होते. नरेंद्र मोदींनी स्वतःच पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.




