भाजपाच्या मदतीमुळेच ऋतुजा लटकेंचा विजय; शेलारांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी बाजी मारली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. मात्र भाजपच्या मदतीमुळेच ऋतुजा लटके यांचा विजय झाला असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हंटल. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हंटल की, भाजपाच्या मदतीमुळे मा. ऋतुजा लटके यांचा अंधेरी पूर्व मध्ये विजय.. ऋतुजाताईंचे अभिनंदन काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप डझनभर पक्षांनी पाठींबा देऊन ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मतं जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता असं आशिष शेलार यांनी म्हंटल.

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत यंदा फक्त ३१ टक्के मतदान झालं होत. यामध्ये ऋतुजा लटके यांना सर्वाधिक 66 हजार 247 मते मिळाली आहेत. परंतु विशेष म्हणजे लटके यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला मिळाली आहेत. नोटाला तब्बल 12 हजार 776 मते मिळाली. नोटाला झालेलं मतदान हे भाजपलाच मिळालेली मतं आहेत. त्यांच्या मनात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता”, असा टोला ऋतुजा लटके यांनी भाजपला लगावला.