हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा खोट्या आणि तथ्यहीन बातम्याही प्रसारित केल्या जात आहेत. त्यातीलच एक बातमी म्हणजे भारताची सुरक्षा कवच असलेली S-400 डिफेन्स सिस्टीम …. हि एअर डिफेन्स सिस्टीम (S-400 Air Defense System) नष्ट झाल्याचा दावा पाकिस्तान कडून गेला जात आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. परंतु असं काहीच झालेलं नसून भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे भारतीयांच्या जीवात जीव आला आहे.
चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्ससह काही वृत्तपत्रांनी दावा केला आहे कि, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खराब झाली आहे, दुसरीकडे पाकिस्तानी PTV ने सुद्धा असच काहीसे म्हणत हायपरसोनिक मिसाइलने S-400 मिसाइल सिस्टिम उद्धवस्त केल्याच वृत्त दिले. परंतु भारताने हा दावा फेटाळून लावत सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली आहे. ANI शी बोलताना एका संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट झाल्याचे किंवा नुकसान झाल्याचे वृत्त निराधार आणि खोटे आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र एस-४०० प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे.
News reports of destruction or any damage to an S-400 system are baseless, fake news: Defence officials pic.twitter.com/RrPOz5gAX1
— ANI (@ANI) May 10, 2025
S-400 एअर डिफेन्स सिस्टीमची वैशिष्ट्ये काय आहेत? S-400 Air Defense System
S-400 एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये एकाचवेळी वेगवेगळ्या टार्गेटसना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. शत्रूची फायटर विमाने, हेलिकॉप्टर, मानवरहीत विमान आणि ड्रोन्सना नष्ट करते. ही अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टिम आवाजाच्या गतीपेक्षा जास्त वेगाने हल्ला करते. या मिसालइल सिस्टिमची रेंज 400 किलोमीटर आहे. 400 किलोमीटर अंतरावरुनच ही सिस्टिम टार्गेट्चा अचूक वेध घेते. एकाच वेळी अनेक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्याची तिची क्षमता आहे. कठीण भूभागातही ती कार्यक्षम आहे. भारताने रशियाकडून हि एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली आहे. भारताने 2018 मध्ये रशियाकडून S-400 खरेदीचा करार केला आणि 2021 पासून त्याची तैनाती सुरू झाली. पाकिस्तानच्या साध्या रॉकेटपासून ते बॅलेस्टिक मिसाइलपर्यंत सर्व हल्ले याच S-400 एअर डिफेन्स सिस्टीम ने परतवून लावले. S-400 एअर डिफेन्स सिस्टीममुळेच (S-400 Air Defense System) भारत पाकिस्तान विरोधात आघाडीवर आहे.




