हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मांडल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे सचिन खरात यांनी मनोहर भिडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संभाजी भिडे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा आहेत कारण सरडा हा वेळोवेळी गरजेनुसार रंग बदलत असतो असं म्हणत सचिन खरात (Sachin Kharat) यांनी भिडेंवर हल्लाबोल केला. तसेच आंतरावलीत मागील वर्षी जाऊन मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्याची आठवणही सचिन खरात यांनी मनोहर भिडे याना करून दिली.
सचिन खरात म्हणाले, संभाजी भिडे यांनी मागच्या वर्षी आंतरावली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, मात्र आता याच संभाजी भिडे यांनी मराठा समाजाने आरक्षण का मागावे असं विधान केलं आहे. याच वरून ते आरक्षण विरोधी आणि बहुजन विरोधी असल्याचे दिसत आहे. आमचं तर स्पष्ट मत आहे कि संभाजी भिडे हे आधुनिक सरडा आहे, कारण सरडा हा वेळोवेळी गरजेनुसार रंग बदलत असतो त्यामुळे संभाजी भिडे हे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा आहे अशी जळजळीत टीका सचिन खरात यांनी केली आहे.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?
आज सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोहर भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत म्हंटल कि, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.