सचिन पायलट- सारा अब्दुल्ला यांचा घटस्फोट? प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राजस्थान विधानसभेची रणधुमाळी सुरु असून काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी टोंक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन पायलट यांनी आपला घटस्फोट झाल्याचा उल्लेख आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 2018 साली त्यांनी सादर केलेल्या पत्रात पत्नी सारा पायलट (Sara Pilot) यांचा उल्लेख केला होता. मात्र आता घटस्फोट हा उल्लेख केल्यामुळे पायलट हे पत्नीपासून वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे.

सचिन पायलट ह्यांची पत्नी सारा अब्दुल्ला या जम्मू काश्मीरचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या कन्या आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सारा पायलट यांचा भाऊ आहेत. सचिन आणि सारा यांची लव्ह स्टोरी संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सचिन पायलट यांच्या प्रतिज्ञापत्रात घटस्फोटीत असा उल्लेख आल्याने पुन्हा एकदा क चर्चाना उधाण आलं आहे.

कधी झाले होते लग्न

सचिन पायलट आणि सारा ह्यांची ओळख अमेरिकेत झाली. त्यांच्यात हळू हळू मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरवले. मात्र सारा ह्यांच्या कुटुंबियांनी ह्या लग्नासाठी सक्त नकार दिला. मात्र तरीही मागे न हटता दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली ती 2004 मध्ये. त्यावेळी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्यामुळे ह्याची चर्चा चांगलीच जोर धरत होती.

आरन आणि विहान ही त्यांची मुले

सचिन आणि सारा यांना आरन आणि विहान अशी दोन मुलं आहेत. प्रतिज्ञापत्रात बोलताना सचिन पायलट यांनी ही दोन्ही मुलं आपल्यावर अवलंबून असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.त्यांनी दोन्ही मुलांचे नाव आश्रित म्हणून उल्लेखले आहे. 2018 साली सुद्धा दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. मात्र ही अफवा असल्याचे पायलट ह्यांनी स्पष्ट केले होते.

पत्रात केला संपत्तीचाही उल्लेख

प्रतिज्ञापत्र सादर करताना पायलट यांनी आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, माझी संपत्ती ही एकूण 7.5 कोटी रुपयाची आहे. जी 2018 मध्ये 3.8 कोटी रुपये एवढी होती. म्हणजे ह्या दोन वर्षात ह्या संपत्तीत दुप्पट वाढ झाल्याचे समजते.