Tuesday, January 7, 2025

Sachin – Sachin Chant Video : विमानात गुंजला सचिन- सचिनचा नारा; चाहत्यांचे प्रेम पाहून क्रिकेटचा देव भारावला (Video)

Sachin – Sachin Chant Video : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. सचिन मैदानात असताना सचिन-सचिनचा नारा देताना प्रेक्षकांना आपण अनेकदा बघितलं असेल. आता क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेऊन १० वर्ष झाली असली अजूनही त्याला लोकांचे मिळणारे प्रेम अजूनही कायम आहे. सचिन ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्याला चाहत्यांचे प्रेम मिळते. अशीच एक गोष्ट आजही दिसली. यामध्ये तर भर विमानातच सचिन- सचिनचा नारा पाहायला मिळाला. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला आहे.

काय आहे या व्हिडिओत – Sachin – Sachin Chant Video

तुम्ही या विडिओ यामध्ये पाहू शकता. सचिन फ्लाइट गेटवरून एन्ट्री घेत आहे, त्याचवेळी चाहते सचिन- सचिन अशी घोषणाबाजी करू लागले. चाहत्यांचे प्रेम आणि आदर पाहून सचिन चांगलाच भारावून गेला. यानंतर सचिनने सर्वांचे आभार मानले आणि हस्तांदोलन करून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. सचिनच्या निवृत्तीला वर्षे उलटली तरी आजही त्याला चाहत्यांचे प्रेम मोठ्या प्रमाणावर मिळत आहे हेच या व्हिडिओच्या (Sachin – Sachin Chant Video) माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

सचिनची कारकीर्द –

सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतिहासातील सर्वात महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर संपूर्ण जगात भारताची मान नेहमीच उंचावली आहे. सचिनने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल ३४,३२७ धावा केल्या आहेत. सचिनने आपल्या करिअर मध्ये एकूण 664 सामने खेळले. यामध्ये 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय सामने आणि एक टी-20 सामन्याचा समावेश आहे. क्रिकेट जगतात १०० शतके झळकवणारा सचिन तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे. त्याने 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय शतके झळकावली आहेत..