Sachin Tendulkar Birthday : 50 वर्षांचा झाला सचिन; त्याचे कधीही न तुटणारे 5 रेकॉर्ड पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक क्रिकेटवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज 50 वर्षाचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक रेकॉर्ड करणारा सचिन आजही भारतीयांच्या मनातील ताईद आहे. सचिनने वयाच्या अवघ्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि 24 वर्षे क्रिकेट जगतावर राज्य केलं. नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली. आज आपण पाहणार आहोत सचिनचे असे काही विश्वविक्रम, जे तोडणं निव्वळ अशक्य आहे.

1) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने-

सचिनने आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामने खेळायचं म्हणजे फॉर्म आणि फिटनेस या दोघांचीही जोड असायला हवी. सध्या T20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता कोणता खेळाडू सचिन इतके कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळेल हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे सचिनचा हा विक्रम तोडणं जवळजवळ अशक्य आहे.

2) क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा-

सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द भलीमोठी आहे. त्याने 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले, हा सुद्धा एक मोठा विश्वविक्रम आहे. 200 कसोटी सामने खेळणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 329 डावांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या. तसेच वनडेमध्ये त्याने 18,426 धावा ठोकल्या. कसोटी आणि वनडेमध्ये सचिनच्या या विक्रमाच्या आसपासही एकही फलंदाज दिसत नाही.

3) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 100 शतके-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव फलंदाज आहे. यामध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 51 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सध्याचे खेळाडू पाहिले तर सचिनचा हा रेकॉर्ड तोडणं सोप्प काम नाही.

4) कसोटी मध्ये सर्वाधिक बाऊंडरी-

सचिनने कसोटी मध्ये तब्बल 2127 वेळा चेंडू सीमापार नेला आहे. यामध्ये 2058 चौकार आणि 69 गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. सध्या कसोटी क्रिकेटचे प्रमाण कमी झालं असून अनेक खेळाडूंचा कल वनडे ani T20 कडे वळत आहे त्यामुळे सचिनचा हा रेकॉर्ड तोडणं सुद्धा अशक्य आहे.

5) सलग 6 वर्ल्ड कप खेळला सचिन-

सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 6 विश्वचषक खेळला. 1992 मध्ये त्याने आपला पहिला वर्ल्डकप खेळला. त्यांनतर सलग 1996, 1999, 2003, 2007, 2011 वर्ल्ड कपमध्ये त्याने भारतासाठी खोऱ्याने धावा काढल्या. सध्या क्रिकेट मध्ये 6 वर्ल्ड कप कोणी खेळू शकेल अस वाटत नाही. खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे अनेक खेळाडू संघाच्या आत बाहेर असतात त्यामुळे सचिनचा हा रेकॉर्ड सुद्धा अबाधित राहण्याची शक्यता आहे.