Sachin Tendulkar: BCCI चा मोठा निर्णय? यंदा सचिन तेंडुलकरला ‘हा’ खास पुरस्कार मिळणार?

0
1
Sachin Tendulkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sachin Tendulkar – BCCI चा मोठा निर्णय? यंदा सचिन तेंडुलकरला ‘हा’ खास पुरस्कार मिळणार? BCCI चा (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) यंदाचा वार्षिक पुरस्कार समारंभ 1 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. हा समारंभ अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष ठरू शकतो. यामागील महत्वाचे कारण म्हणजे बीसीसीआयकडून यंदाच्या वार्षिक पुरस्कार समारंभात सचिन तेंडुलकरला कर्नल सीके नायडू या खास पुरस्काराने सन्मानित कले जाऊ शकते . तर हा पुरस्कार त्याला मिळणार का यावर अनेक चर्चा सुरु आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

सचिन तेंडुलकरला मिळणार अवॉर्ड ( Sachin Tendulkar)

बीसीसीआय द्वारे दरवर्षी या समारंभात अनेक खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पुरस्कार जाहीर केले जातात. मात्र यावर्षी बीसीसीआयचा खास पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता होतीच. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय दिग्गज भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरला ‘सीके नायडू’ पुरस्काराने सन्मानित करू इच्छित आहे. विशेष म्हणजे सचिनला याआधी कधीच हा पुरस्कार मिळालेला नाही. म्हणजेच पहिल्यांदाच सचिनला हा सन्मान मिळू शकतो. सचिनला जीवनगौरव म्हणून हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. BCCI कडून दिला जाणारा हा पुरस्कार तेंडुलकरच्या कारकिर्दीच्या उल्लेखनीय योगदानाची एक वेगळी ओळख आणि गौरव आहे. पण सध्या फक्त अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

सचिन तेंडुलकरचे क्रिकेट करिअर –

1989 ते 2013 दरम्यान 24 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)जवळपास 200 टेस्ट मॅचेस, 463 वनडे आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. या सर्व मॅचेसमध्ये त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतकांसह 34,357 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणजे एकूण 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने कसोटीत विक्रमी 15,921 धावा आणि एकदिवसीय सामन्यात 18,426 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्याच्या क्रीडाशास्त्राने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात एक आदर्श निर्माण केला आहे.

सचिन तेंडुलकरला आत्तापर्यंत मिळालेले पुरस्कार –

सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2012 मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियानेही गौरविण्यात आले होते. आयसीसी आणि बीसीसीआयनेही सचिनला अनेक क्रीडा पुरस्कार दिले आहेत. याव्यतिरिक्त, सचिन तेंडुलकरच्या या पुरस्कारामुळे त्याच्या अनगिनत चाहत्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण होईल आणि आगामी काळात भारतीय क्रिकेटला आणखी एक प्रेरणा मिळेल.

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज

नरेंद्र मोदींच्या वक्तव्यामुळे आयकरात सूट मिळणार? मध्यमवर्गीयाना मोठा दिलासा?