साहेबाला काय म्हसरं राखायची आहेत का? पवारांबद्दल बोलताना सदाभाऊंचा तोल सुटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आपल्या रांगड्या भाषणासाठी ओळखले जातात. सदाभाऊ आपल्या ग्रामीण शैलीतून विरोधकांचा खरपूस समाचार घेत उपस्थित लोकांचेही मनोरंजन करत असतात. सदाभाऊ खोत हे शरद पवार (Sharad Pawar) विरोधी नेत्यांमध्ये मोडतात. आजही त्यांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर सडकून टीका करताना पातळी सोडली. आता साहेबाला काय काम आहे? त्यांना म्हसरं राखायची आहेत? की जनावारांना पाणी पाजायचं आहे? असं म्हणत सदाभाऊंनी शरद पवारांवर निशाणा साधला.

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलत असताना सदाभाऊ खोत म्हणाले, या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक चर्चा आहेत. काय तर म्हणे साहेबांचं वय 84 म्हणून ते महाराष्ट्रात 84 सभा घेणार अशा चर्चा सुरू आहेत. आता साहेबाला काय काम आहे? त्यांना म्हसरं राखायची आहेत? की जनावारांना पाणी पाजायचं आहे? आता हाच धंदा करायचा आहे. पण त्यांना मानलं पाहिजे. या वयातही ते आमच्या सारख्यांना संधी देत नाहीत,” अशा शब्दात सदाभाऊंनी टीकास्त्र सोडलं.

ते पुढे म्हणाले, मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हातात प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडत आहे. अजित पवार किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले. अजित पवारांच्या आता लक्षात आलं की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत आणि म्हणतंय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. कारण आता हे बास झालं आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? म्हणून अजित पवार महायुतीमध्ये आले,” असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. सदाभाऊ खोत यांचे हे भाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.