Satara News :…तर इंडिया आघाडी तुम्हाला जड जाईल; सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण आज कृषिप्रधान राज्य असून देखील या राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे हेच माहिती नाही. या सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष द्यावं लागेल. तरच इंडियाचा प्रभाव होऊ शकेल. अन्यथा इंडिया तुम्हाला जड जाईल असे महत्वाचे विधान करीत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांचं रक्त जर कोणाच्या काळात सांडलं गेलं असेल तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात सांडलं गेलं. मुख्य जनावरांना मारावं अशा पद्धतीनं जनतेला मारण्याचं काम या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालं असल्याचे खोत यांनी म्हंटले.

माजी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सचिन नलवडे उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यातील सोयाबीन उत्पादनावरील प्रश्नावर बोलताना पणन खात्याच्या मंत्र्यांबाबत सवाल उपस्थित केला. राज्याला पणन खात आहे या खात्याला मंत्री आहे का? असेल तर ते कोण? असे विचारायची वेळ आज आली आहे. कारण मार्केटिंग व्यवस्था हि भक्कम असणं गरजेची असते. म्हणून आमच्या काळात आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीला आम्ही चालना दिलेली होती. त्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल किंवा कडधान्य असेल ते खरेदी करण्याची परवानगी आम्ही दिलेली होती.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1061098958255303

 

सध्याच्या सरकारला शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर त्यांनी….

राज्यात पर्जन्यमान आवश्यक झाले नसल्यामुळे भविष्यकाळात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासणार आहे. अशा परिस्थितीत बारकाईने विचार केल्यास अशा परिस्थिती सोयाबीन, उसाचे उत्पादन हे घटणार आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने गाळप होईल अशी परिस्थिती आज राज्यात नाही. सोयाबीनचे जे आज भाव आहेत. त्यावर जर चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्यायचे असतील तर शेतकऱ्यांनी परदेशातून खाद्यतेल आयात करू नये. किंवा पेंड आयात करू नये. जेणेकरून राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतील, असे खोत यांनी म्हंटले.

सोन्याचा ऊस भंगाराच्या भावात खरेदी करण्याचा साखर कारखानदारयाचा डाव…

उसाच्या बाबतीत सांगायचे झाले तर ऊस घालवण्याची शेतकऱ्यांनी गडबड करू नये. यावर्षी उसाची काडी हि सोन्याची आहे. तिला भंगाराच्या भावात खरेदी करण्याचा डाव हा राज्यातील साखर कारखानदारांनी आखलेला आहे. खरं बघितलं तर गेल्या वर्षीचा जो ऊस तुटलेला आहे. या उसाला २०० रुपये दिवाळीला शेयतकऱ्यांना देणे गरजेचे आहे हि रयत संघटनेची मागणी आहे. जो जाणारा ऊस आहे २०२४ चा त्या उसाला एफआरपी अधिक ५०० रुपये हा पहिला एडव्हान्स ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे कारण साखरेचे भाव हे बाजारपेठेत चांगले असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हंटले.