आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?? नेमकं चाललंय तरी काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । वेदांता फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क आणि आता टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नागपूर येथील सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.

फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. कंपनी हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरु करणार होती. मात्र, जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. विदर्भात आधीच रोजगाराचा वणवा आहे , त्यातच आता 1115 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असणारा हा पकल्प हैदराबादला गेल्यामुळे स्थानिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून वेदांता फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क, त्यानंतर टाटा एअर बस आणि आता सॅफ्रान कंपनीचा प्रोजेक्ट राज्याबाहेर गेल्यामुळे राज्यातील रोजगार निर्मितीला त्याचा मोठा फटका बसणार आहे. याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून सरकारवर टीका करत आहेत. राज्यात ईडी सरकार आल्यापासून उद्योग राज्याबाहेर जाऊ लागले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.