Saif ali Khan Attack : बॉलिवूड जगतातून आता एक मोठी बातमी हाती आली आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मुंबईत रात्री उशिरा घरात कोणीतरी घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत अभिनेत्याला (Saif ali Khan Attack) अनेक गंभीर दुखापती झाल्या असून. त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहेत. त्याला पाठीच्या कण्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांपासून बचावर करीत असताना झालेल्या झटापटीत हल्लेखोराने सैफवर (Saif ali Khan Attack) चाकूने 6 वार केले.
सैफच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून ताजी माहिती समोर आली असून याबाबत अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले (Saif ali Khan Attack) आहे. अभिनेता सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. रुग्णालयाच्या सीईओच्या निवेदनानुसार, अभिनेत्याला पहाटे 3-3:30 वाजता 6 जखमांसह दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एक त्याच्या मणक्याच्या अगदी जवळ होता. लीलावती हॉस्पिटलचे सीईओ नीरज उत्तमानी म्हणाले, ‘सैफ अली खानला पहाटे 3-30 वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
सैफला सहा जखमा आहेत, त्यापैकी दोन खोल आहेत. त्याच्या पाठीच्या कण्याजवळ दुखापत झाली आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत त्यांचे ऑपरेशन न्यूरो सर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी करत आहेत. तर पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.
करीनाच्या पीआर टीमकडून माहिती (Saif ali Khan Attack)
त्याचवेळी, करीना कपूरच्या पीआर एजन्सीने असेही सांगितले आहे की, “काल रात्री तिच्या आणि सैफच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो रुग्णालयात आहे. कुटुंबातील बाकीचे सदस्य पूर्णपणे ठीक आहेत.
निवेदनात असे लिहिले आहे की, “आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची (Saif ali Khan Attack) विनंती करतो पोलिस आधीच या प्रकरणाचा तपास करत आहेत. आपल्या चिंतेबद्दल सर्वांचे आभार.” असे निवेदनात म्हंटले आहे.