Saif Ali Khan Attack : सैफ नाही चिमुकल्या जेहला ओलीस ठेवण्याचा होता प्लॅन,आरोपीकडून धक्कादायक खुलासे

0
1
Saif Ali Khan Attack
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Saif Ali Khan Attack : सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) वर तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपी मोहम्मद शहाजाद याला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार आरोपीचा मुख्य टार्गेट सैफ नसून त्याचा लहान मुलगा जेह असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीचा ‘रेकी प्लॅन’ (Saif Ali Khan Attack)

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्या घरांसह अन्य काही घरांची हेरगिरी आरोपीने केली होती. वांद्र्यातून प्रवास करताना रिक्षाचालकाकडून या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती आरोपीने गोळा केली होती.सैफ अली खानच्या घरात घुसणे तुलनेने सोपे वाटल्याने आरोपीने ते घर निवडले.

सैफच्या मुलाला ओलीस ठेवण्याचा कट

आरोपीने सैफचा मुलगा जेह (जहांगीर) याला ओलीस ठेवून पैशांची मागणी करण्याचा कट (Saif Ali Khan Attack) रचला होता. मात्र, त्याचा हा डाव फसला. घरातील सर्व सदस्य जागे झाल्याने घाबरलेल्या आरोपीने सुटकेचा प्रयत्न करत अंधाधुंद वार केले. सैफवर तब्बल 6 वार करून तो घटनास्थळावरून फरार झाला.

सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी बेफिकिरीने वागला. घटनास्थळावरून पळून जात तो निवांत झोपला. उठल्यानंतर कपडे बदलून तो वांद्रे स्थानकावर गेला आणि तिथून दादर, वरळीमार्गे एका पूर्वीच्या कॅफेमध्ये पोहोचला. आरोपीला बांगलादेशला पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्टची गरज होती, त्यासाठी पैसे उभारण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता.

आरोपीचा मास्टरप्लान उघड (Saif Ali Khan Attack)

पोलिसांनी आरोपीला पकडून चौकशी केली असता, तो कामाच्या शोधात ठाणे येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. आरोपीने हल्ल्याच्या मागचे कारण आणि पुढील कट सांगितल्यामुळे प्रकरणातील गंभीरता वाढली आहे.

पोलिसांचा तपास फुल अ‍ॅक्शन मोडमध्ये

या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. आरोपीने रचलेला मास्टरप्लान आणि त्याच्या हालचालींच्या तपशिलामुळे प्रकरण आणखी गूढमय बनले आहे.