Saif ali Khan Attack : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मुंबईत रात्री उशिरा घरात कोणीतरी घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत अभिनेत्याला (Saif ali Khan Attack) अनेक गंभीर दुखापती झाल्या असून. त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या नव्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या टीमने एक नवे वक्तव्य जारी केले आहे. टीमने सांगितले की, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून तो धोक्याबाहेर आहे. सैफ अली खान तंदुरुस्त झाला असून डॉक्टर त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तपासासाठी गुन्हे शाखेच्या 15 टीम
दरम्यान , सैफ अली खानवरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस सतत स्कॅन करत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये दोन संशयित पाहिले आहेत. दोन्ही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्थानिक आणि गुन्हे शाखेच्या एकूण 15 टीम तयार केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही (Saif ali Khan Attack) फुटेज तपासत आहेत.
‘या’ लोकांचीही पोलिसांकडून चौकशी
सैफ अली खानच्या घरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून फ्लोअर पॉलिशिंगचे काम सुरू आहे. या मजुरांचीही पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणीही येताना किंवा जाताना दिसले नाही. सैफवर हल्ला करणारे आरोपी चोरीच्या इराद्याने घरात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात पोलीस गेल्या दोन-तीन दिवसांपासून सैफ अली खानच्या घरी गेल्या आठवड्यात कामासाठी (Saif ali Khan Attack) आलेल्या एका व्यक्तीची चौकशी करत आहेत. हल्लेखोर मोलकरणीच्या खोलीतून सैफच्या घरात घुसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर तो मुलांच्या खोलीत गेला. मोलकरणीला याची माहिती मिळताच तिने हल्लेखोराला थांबवले. आवाज ऐकून सैफही खोलीत गेला आणि हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला.
लेक सारा वडिलांना लीलावती हॉस्पिटलमध्ये
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान वडिलांना भेटण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. त्याच्यासोबत इब्राहिम अली खानही दिसला होता.
सैफ अली खानला त्याचा मुलगा इब्राहिम अली खान हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तो सैफ अली खानपासून काही अंतरावर राहतो. इब्राहिम अजूनही रुग्णालयातच आहे.
सैफ अली खानची प्रकृती आता चांगली आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे. सैफच्या घरी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम हजर असून कसून तपास केला जात आहे.