हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Salary Increment 2025 – नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी पगारवाढ हा महत्त्वाचा मुद्दा असतो. प्रोत्साहनासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी पगारवाढ आवश्यक मानली जाते. 2024 चालू आर्थिक वर्ष संपले असून , नव्या आर्थिक वर्षात किती पगारवाढ मिळेल याकडे नोकरदारांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच मर्सर या एचआर कन्सल्टन्सी कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांत भारतात कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्याने वाढ होत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती
जाणून घेऊयात.
9.7 टक्के पगारवाढ (Salary Increment 2025) –
2020 साली 8 टक्के पगारवाढ झाली होती. त्याच तुलनेत यंदा पगारवाढीचा आकडा अधिक असल्याचे दिसून येते. वाहन उत्पादन, यांत्रिक आणि तांत्रिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यंदा सरासरी 10 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे. विशेषतः इंजिनिअरिंग क्षेत्रात 9.7 टक्के पगारवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात 8.8 टक्के पगारवाढ झाली होती. कुशल कर्मचाऱ्यांची मागणी आणि आर्थिक वृद्धी हे घटक यामागील प्रमुख कारणे आहेत.
अधिक पगारवाढीचा विचार –
मर्सरच्या ‘इंडिया करियर लीडर’ मानसी सिंघल यांनी सांगितले की, भारतात कुशल कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी अधिक पगारवाढीचा विचार करत आहेत. आर्थिक सेवा, उपभोक्ता वस्तू आणि वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता. आगामी आर्थिक वर्षातही या क्षेत्रांतील पगारवाढीचे (Salary Increment 2025) प्रमाण चांगले राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
लोकांच्या जीवनमानाचा आर्थिक दर्जा सुधारेल –
पगारवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा आर्थिक दर्जा सुधारेल. जनता आपल्या गरजा सहज पूर्ण करू शकतील . मर्सर या एचआर कन्सल्टन्सी कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरासरी 9.4 टक्के पगारवाढ (Salary Increment 2025) होण्याची शक्यता वर्तवली आहे. जर हि शक्यता खरी झाली तर नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा : नोकरदारांसाठी AIचा फटका ; विविध क्षेत्रातील 2 लाख नोकऱ्या धोक्यात ?