Tuesday, January 7, 2025

सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मेसेज पाठवत केली 2 कोटींची मागणी

अभिनेता सलमान खान वर आलेले संकटाचे वादळ काही हटण्याचे नाव घेत नाहीयेत. सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा ट्रेंड मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. दरम्यान, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काल म्हणजेच मंगळवारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताब्यात एक मेसेज आला, ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आणि मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची मागणी केतयाची माहिती आहे.

वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणावर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेसेजमध्ये पाठवणाऱ्याने असेही म्हटले आहे की, जर त्याला पैसे मिळाले नाहीत तर सलमान खानला मारून टाकू. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनीही तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सलमानला अनेकदा धमक्या आल्या आहेत

दरम्यान सलमान खानचे निकटवर्तीय नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान आता कुठेही जाताना त्याच्यासोबत गार्ड असतात. सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोईचे सहकारी फेसबुक पोस्टद्वारे एकामागून एक धमक्या आणि हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारताना दिसत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.

सलीम खान यांच्या वक्तव्यावरुन वाद

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमानने काहीही चूक केलेली नाही, त्यामुळे त्याला माफी मागण्याची गरज नाही. सलमानने आजपर्यंत एक झुरळही मारलेले नाही, असेही ते म्हणाले. मात्र, सलीम खान यांनी दिलेल्या वक्तव्यावर बिष्णोई समाजातील अनेक लोक चांगलेच संतापले. शिवाय त्यांच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमामधून उमटल्या.