Tuesday, January 7, 2025

बिश्नोईच्या धमक्यानंतर सलमानने खरेदी केली होती बुलेट प्रूफ कार ; SUV ची किंमत पाहून भुवया उंचावतील

भारतात बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि काळवीट प्रकरणाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगने सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याचा इशारा दिला आहे. खरंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून तो धमक्या देत होता. या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या धमक्यांना पाहता सलमान खानने खास बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. तुम्हाला या कारचे नाव आणि किंमत माहित आहे का? हा कार ब्रँड भारतात फारसा लोकप्रिय नसला तरी सलमानने या कंपनीकडून खरेदी केलेल्या महागड्या एसयूव्हीची किंमत खूपच जास्त आहे.सलमान खानने एप्रिल 2023 मध्ये मोठी रक्कम भरून ही कार दुबई मधून आणली होती. ही बुलेटप्रूफ SUV आहे, ज्यामध्ये सलमान खान मुंबईत प्रवास करतो. या हायटेक SUV कारचे फीचर्स काय आहेत आणि तिची किंमत काय आहे ? चला जाणून घेऊया …

बुलेटप्रूफ कारचे नाव आणि वैशिष्ट्ये

वाढत्या धमक्यांमुळे सलमान खानने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये Nissan Patrol SUVची ऑर्डर दिली होती. ही त्यांची दुसरी बुलेटप्रूफ कार आहे, याआधी तो टोयोटा लँड क्रूझर प्राडो एसयूव्हीमध्ये प्रवास करत होता. Nissan Patrol SUV सलमान खानने दुबईतून खरेदी केली होती. 5.6-लिटर V8 पेट्रोल इंजिन निसान पेट्रोल एसयूव्ही 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि मानक चार-चाकी ड्राइव्ह सिस्टमसह येते.

काय आहे कारची किंमत ?

सलमान खानची बुलेट प्रूफ Nissan Patrol SUV भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही, त्यामुळे या मॉडेलची किंमत स्पष्ट नाही. ईटीच्या अहवालानुसार, निसान पेट्रोलची (इम्पोर्टेड) ​​किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफिंग क्षमतेसह इतर वैशिष्ट्ये जोडल्यानंतर या कारची किंमत आणखी जास्त होते.

यापूर्वीही दिल्या आहेत धमक्या

काळवीट मारल्याप्रकरणी सलमान खानवर खटला सुरू आहे. याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे उद्दिष्ट असल्याचे लॉरेन्सचे म्हणणे आहे. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असून सलमान खान त्यांच्या मुख्य निशाण्यावर आहे.