भगवान श्रीकृष्णांशी केली अखिलेश यादव यांची तुलना, प्रचारगीत झालं व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश मध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. मात्र या निवडणुकांची तयारी आतापासून राजकीय पक्ष करत असल्याचे दिसत आहे . सोशल मिडीया आणि डिजिल माध्यम ही प्रचाराची प्रमुख साधनं बनली आहेत. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीने प्रचारासाठी एक नवं गाणं प्रदर्शित केले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचा उल्लेख मुरलीधर कृष्ण असा केला आहे. समाजवादी पार्टीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सध्या हे गाणं भलतच गाजत आहे.

https://www.facebook.com/watch/?ref=external&v=489213889023412

अखिलेश आ रहे है

मुरलीधारी कृष्ण बदलकर वेश आ रहे है, अखिलेश आ रहे है असे या गाण्याचे बोल आहेत. पक्षाचे नेते राजकुमार भाटी लिहितात की, या गाण्यामध्ये अखिलेश यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांची झलकही दाखवण्यात आली आहे. या गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत काम पोहचवण्याचा प्रयत्न केला असून अखिलेश यांच्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार आहे.

भाजपचा भावनिक प्रचार चालणार नाही

अखिलेश यादव यांनी सध्या भाजपावर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे.कालच्याच त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी आता भाजपा नको असं म्हणत भाजपाच्या कारभारावर टीका केली आहे.भाजपाचा भावनिक प्रचार आता चालणार नाही. त्यांना आत्तापर्यंत वाटत आलं की आपण जनतेला बनवलं आहे, त्यांची फसवणूक केली आहे. पण आता जनताच भाजपाला धडा शिकवेल. भाजपाच्या बतावण्या आता खूप झाल्या, असं ट्विट अखिलेश यांनी केलं आहे.

Leave a Comment