शिवनेरीवर जयंती सोहळ्यात संभाजीराजे संतापले; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर उभे राहत दिले आव्हान; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यात साजरी होत असताना शिवनेरीवर मात्र माजी खासदार संभाजी छत्रपतींनी आक्रमक पावित्रा घेतला. छत्रपतींच्या शिवप्रेमींना शिवनेरीवर दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आल्याने माजी खासदार संभाजी छत्रपती संतापले. हा दुजाभाव कशासाठी? सर्वांनाच प्रवेश दिला पाहिजे. शिवनेरीवर दुजाभाव होता कामा नये. जोपर्यंत शिवप्रेमींना शिवनेरीवर सोडलं जात नाही. तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा इशारा देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्यानी आव्हान दिले.

आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माजी खासदार संभाजीराजे हे शिवनेरीवर शिवजयंतीसाठी आले होते. मात्र, शिवनेरीवर शिवप्रेमींना सोडलं जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.

शिवप्रेमींच्या मध्ये जात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर उभे राहून त्यांच्याशी संवाद साधला. जोपर्यंत शिवप्रेमींना शिवनेरीवर सोडलं जाणार नाही, तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. तसेच त्यांनी शासकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला.

काय म्हणाले संभाजीराजे?

शिवप्रेमींच्या गराड्यात उभे राऊतने संभाजीराजेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. “दुजाभाव करू नका. आम्ही दरवर्षी येतो. पायी येत असतो. त्यामुळे शिवप्रेमींना शिवाजी महाराजांचं दर्शन घेता आलं पाहिजे. तुम्ही शिवजयंती साजरी करा. जयंती साजरी केली पाहिजे. आमची त्याला ना नाही. पण शिवनेरीवर दरवर्षी नियोजन नसतं. आम्ही किती सहन करायचं? दुजाभाव करू नका. सर्वांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे,” असं संभाजीराजे यांनी म्हंटले.

एकनाथ शिंदेंनी केले आवाहन

संभाजीराजेंच्या आक्रमक पावित्र्यानंतर समोर उभे असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात माईक घेऊन संभाजीराजे यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केले. तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या भावनांची नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचं आहे. आपलं आहे. आपण किल्ले जपण्याचं काम करू. पुढच्या वर्षीचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असं आश्वासन मी तुम्हाला देतो, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.