निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी धोक्यात आलीय?

Nilanga assembly
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लातूर गेला… आता निलंगेकरांच्या हातून निलंगाही जातोय… होय… ज्या लातूरला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जायचं त्या लातूरच्या लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी ज्या भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती…त्यांच्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार तब्बल 28 हजार मतांनी पिछाडीवर गेला… हा आकडा सांगतोय… भाजपच्या हातातून लातूर तर गेलाच…पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलंगाही… दोन टर्मचे आमदार राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचा येणाऱ्या विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी काँग्रेसचे अनेक मोहरे सध्या समोर आलेत… लोकसभेतील निलंग्याचा काँग्रेसच्या बाजूने प्लस मध्ये जाणारा आकडा पाहता अनेक इच्छुकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागलेत…तर दुसरीकडे लोकसभेच्या पराभवाचे क्लारिफिकेशन देत संभाजी पाटलांनी काहीही झालं तरी विधानसभेला आपणच निवडून येत असतोय… हे अगदी ठासून सांगितलंय… मग आता यातलं नेमकं खरं काय आणि खोटं काय? संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी राहतेय की जातेय? निलंगा मतदार संघातील सामान्य जनतेचा कौल सध्या तरी कुणाच्या बाजूने दिसतोय? निलंग्यात निलंगेकर फॅक्टर राजकारणात अस्ताकडे कसा चाललाय?

लातूरच्या राजकारणात निलंगा विधानसभा हा नेहमीच इम्पॉर्टंट राहिलाय… निलंगेकर कुटुंबानं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही… याच निलंग्याने महाराष्ट्राला शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्रीही दिला… ग्रामीण महाराष्ट्राची जाण आणि शिस्तप्रिय राजकारणी म्हणून त्यांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय होता…2004 पर्यंत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीच एक दोन अपवाद वगळता निलंग्याची आमदारकी आपल्याजवळ ठेवली… पण 2004 च्या आसपास असं काही घडलं की निलंग्याच्या राजकारणात विखार पाहायला मिळाला… कौटुंबिक वादातून पाटील निलंगेकर घराण्यात राजकीय विस्तव पडला…. आणि तत्कालीन भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण – तडफदार शिवाजीरावांचा नातू संभाजी पाटील निलंगेकर याला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं… देशात पहिल्यांदाच एकाच घरात पाहायला मिळालेल्या आजोबा विरुद्ध नातू अशा या संघर्षात भाजपने संपूर्ण ताकद लावली… आणि मुख्यमंत्री राहिलेल्या… आणि तत्कालीन गृहमंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्याच नातूने पराभव केला… अर्थात ही राजकीय ठिणगी होती… याची धग पुढेही कायम राहिली…

2009 च्या निवडणुकीत आजोबांनी पुन्हा रिव्हर्स गिअर टाकत नातवाला पराभवाचा दणका दिला… पण 2014 ला शिवाजीराव पाटलांचं वय लक्षात घेता त्यांनी आपला मुलगा अशोक पाटील निलंगेकरांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलं…तर भाजपकडून अर्थात संभाजी पाटील निलंगेकर हे उमेदवार होते… अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत काकाला पराभूत करून संभाजी पाटील निलंगेकरांनी पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं… अगदी हाच कित्ता त्यांनी 2019 लाही गिरवला… थोडक्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय वर्चस्वाला नख लावणं वाटतं तितकं सोपं नाही… हे जणू त्यांनी दाखवून दिलं… फडणवीस सरकारच्या काळात कामगार मंत्री राहिलेल्या याच संभाजी पाटलांना नुकत्याच पार पडलेल्या लातूर लोकसभेची भाजप समन्वयकाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती… यावरून त्यांच्या मतदार संघावर असणाऱ्या कंट्रोलचा अंदाज आपल्याला येऊ शकतो…

आजोबांना एकदा… तर काकांना दोनदा… पराभवाचं पाणी पाजणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांनी संस्थात्मक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला होल्ड मिळवायला सुरुवात केली… पण सत्तेत महत्त्वाच्या पदांवर राहून देखील मतदार संघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये… निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता, शिक्षण संस्थांची कमतरता, औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसावणारा पाणी प्रश्न या सगळ्यांमुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबाबत मतदारसंघात अँटी इनकंबनसी आहे, हे नाकारून चालणार नाही… त्याचंच रिफ्लेक्शन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांतही दिसलं… संभाजी पाटील निलंगेकरांच्या मतदारसंघातूनच म्हणजेच निलंग्यातूनच 28 हजार मतांच्या पिछाडीवर भाजप उमेदवाराला राहावं लागलं… हा जितका भाजप नेतृत्वाचा पराभव होता… भाजपच्या उमेदवाराचा पराभव होता… तितकाच तो संभाजी पाटील निलंगेकरांचाही… म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी इथं काठावर आलीये….

2024 साठी महायुतीकडून या जागेसाठी संभाजी पाटील निलंगेकरच निवडणूक लढवतील, याबाबत नो डाऊट…. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून काका अशोक पाटील निलंगेकर सलग दोन टर्मच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यंदा जोरदार फील्डिंग लावतील… यासोबत डॉ. अरविंद भातांबरे आणि अभय सोळुंके यांचीही नाव इच्छुकांच्या यादीत घेतली जातायेत… मात्र सतत दोन टर्म चे अपयश, मतदारसंघातील अगदी तुरळक जनसंपर्क यामुळे अशोक पाटील निलंगेकरांच्या नावावर यंदा काँग्रेस फुली मारू शकतो… तर दुसऱ्या बाजूला 2019 ला वंचितकडून चांगली लढत दिलेल्या भातांबरे हे नंतर काँग्रेसमध्ये आल्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याचे सध्या जास्त चान्सेस वाटतायत… मतदार संघात लिंगायत, मुस्लिम, दलित समाजाची संख्या लक्षणीय असली तरी निलंग्यानं नेहमी मराठा उमेदवाराला आमदार केलं… त्यामुळे यंदा निलंगेकर घराण्यातून निलंग्याचा कौल भातांबरे यांच्या रूपानं लिंगायत समाजाकडे शिफ्ट होईल का? हे पाहणं फूट महत्वाचं आहे…

शेवटी मुद्दा राहतो तो फक्त वाऱ्याच्या अंदाजाचा… लोकसभेला संभाजी पाटील निलंगेकर मायनस मध्ये असले तरी त्यांचा मतदारसंघावर असणारा होल्ड सर्वांना माहिती आहेच… त्यात लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर आणि विधानसभा वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्यानं हा रिझल्ट आहे असा विधानसभेला पाहायला मिळेल, असं म्हणणं थोडं धाडसाच ठरेल… आपण कितीही नाकारलं तरी संभाजी पाटील निलंगेकरांचा तगडा जनसंपर्क, लोकांच्यात मिसळण्याची कला आणि अनेक छोट्या मोठ्या विकास कामांमुळे तेच या निवडणुकीत सरशी मारतील, असं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसतय… बाकी काँग्रेसला संभाजी पाटलांची विजयी हॅट्रिक रोखायची असेल तर संभाजी पाटलांच्या विरोधात तोडीस तोड सक्षम उमेदवार दिल्यास काँग्रेसचा हा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळू शकतो… पण काँग्रेसकडून उमेदवार कोण? हाच सध्यातरी निलंग्याच्या राजकारणातील एक्स फॅक्टर असणार आहे…. वन लाईन मध्ये सांगायचं झालं तर निलंग्यात आमदारकीचा कौल यंदा तरी फिफ्टी फिफ्टी पाहायला मिळतोय…पण त्यातही काँग्रेसनं माती न खाता नीट डाव टाकले तर यंदा भातांबरे आमदारकीच्या खुर्चीवर बसू शकतात, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…बाकी निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करतील की काँग्रेस निलंगेकरांच्या राजकीय लेगसीला धक्का देत सर्वसामान्य उमेदवाराच्या हातात सत्तेच्या चाव्या देतील? याबद्दल तुम्हाला काय वाटतं?