अजित पवारांच्या ‘धर्मवीर’ विधानावरून संभाजीराजे आक्रमक; दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक विधान केले. त्यांच्या या विधानावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला आहे. “अजित पवार यांनी बोलताना नेमका कोणता संदर्भ दिला मला माहिती नाही. पण अजित पवार जे काही बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होतेच यात काही शंका नाही पण ते धर्मवीरही होते. त्याबाबतचे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत. मात्र, अजित पवारांनी सांगावे कि ते कोणत्या पुराव्याच्या आधारे बोलले?,” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली आहे. ते स्वराज्य रक्षक होते यात हे खरं आहे. त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले यात दुमत नाही.

संभाजी महाराजांनी धर्माचंही रक्षण केलं हे कोणीही नाकारू शकत नाही.म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेत शिवाय ते एक धर्मरक्षकही आहेत. हे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.