व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर तब्बल 729 अपघात; ही आहेत वेगवेगळी कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण (Samruddhi Mahamarg Accident) वाढले आहे. आता याबाबतचं अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग डॉ. रवींद्र सिंगल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गावर कोणत्या कारणांसाठी किती अपघात झाले याचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये, तब्बल ८३ अपघात फक्त प्राणी गाड्यांच्या मध्ये आल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. तर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ काळात ७२९ अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय आहेत अपघाताची कारणे? (Samruddhi Mahamarg Accident)

डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ७२९ अपघातामध्ये ३३८ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. तर ३९१ किरकोळ व गंभीर अपघातात १०१ मृत्यू व ७४८ जखमी झाले आहेत. तर गाड्यांच्या मध्ये प्राणी आडवे आल्यामुळे झालेल्या ८३ अपघातांपैकी ६६ मध्ये कुणीही जखमी झाले नाही. परंतु चार अपघातांमध्ये १ मृत्यू व २५ जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर गाडीचा टायर फुटल्यामुळे ०९ अपघात झाले आहेत. यामध्ये ही कोणीही जखमी झालेले नाही. ६१ अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १४२ जखमी झाले आहेत.

इतकेच नव्हे तर, रात्री गाडी चालवताना झोप लागल्यामुळे २४२ अपघात (Samruddhi Mahamarg Accident) समृद्धी महामार्गावर झाले आहेत. यातील १३० अपघातात ४४ मृत्यू तर २५४ जण जखमी झाले आहेत. यांत्रिकी कारणामुळे २७ अपघात झाले ज्यातील ११ मध्ये कुणीही जखमी झाले नाही. ८४ अपघातात ३३ मृत्यू तर १५२ जण जखमी झाले. तसेच, ब्रेकडाऊनमुळे २२ अपघात झाले ज्यातील ६ अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. यासोबत १६ अपघातात २ मृत्यू तर २२ जण जखमी झाल्याची माहिती डॉ. रवींद्र सिंगल दिली आहे.

सर्वाधिक मृत्यू रात्रीच्या वेळी

दरम्यान, रवींद्र सिंगल यांनी सांगितले आहे की या सर्व अपघातांमध्ये (Samruddhi Mahamarg Accident) सर्वाधिक अपघात रात्रीच्या वेळी झाले आहेत. यामध्ये रात्री १२ ते ३ दरम्यान होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रात्री ३ ते पहाटे ६ वेळेत सहा अपघात झाले असून त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत १३ अपघातात २१ मृत्यू झाले आहेत. रात्री ९ ते रात्री १२ वेळेत ५ अपघातात १० मृत्यू झाले आहेत. मुख्य म्हणजे, राज्यात वर्षभरात, १५ हजार २२४ अपघाती मृत्यू झाले असून यातील ७ हजार ७०० मृत्यू दुचाकी चालणाऱ्या व्यक्तींचे झाले आहेत. यामध्ये हेल्मेट न वापरलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे.