समृद्धी महामार्गावर बस पेटली; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस बुलढाण्यात पलटी होऊन आग लागली. या आगीत तब्बल 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरहुन पुण्याला जाणारी खासगी बस रात्री 1 वाजता सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक पलटी झाली. बस पलटी होताच आग लागली आणि अगदी काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं. यावेळी बसमधील प्रवाशांनी आरडा ओरडा केला. मात्र बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यासाठी मार्गच नव्हता. या आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून वाचले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.